शुक्रवार, २१ मार्च, २०२५
चिखलदरा येथे रविवारी ‘मेळघाट रंगोत्सव’ सांस्कृतिक महोत्सवात सेवा आणि स्पर्धांचा संगम
चिखलदरा येथे रविवारी ‘मेळघाट रंगोत्सव’
सांस्कृतिक महोत्सवात सेवा आणि स्पर्धांचा संगम
अमरावती, दि. 21 :जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद अमरावती आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी यांच्या वतीने चिखलदरा येथे 'मेळघाट रंगोत्सव 2025'चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 23 मार्च रोजी गिरीजन शाळेसमोरील मैदानावर सकाळी 10 वाजल्यापासून या महोत्सवाला सुरुवात होणार आहे.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्षस्थानी राहतील. तसेच, तसेच खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखडे, आमदार किरण सरनाईक, धिरज लिंगाडे आणि केवलराम काळे उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवात विविध सेवांची माहिती आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात नागरिकांसाठी आधार अपडेट, ऍग्रीस्टॉक नोंदणी, रेशनकार्ड नोंदणी, गोल्डन कार्ड नोंदणी, असंसर्गजन्य रोगांची चाचणी, सिकलसेल तपासणी, मोफत डोळे तपासणी, विनाशुल्क मौखिक तपासणी, घरकुल योजना आणि रोजगार हमी योजना आणि पोस्ट ऑफिस व बँक खाते उघडण्याची सुविधा राहणार आहे. तसेच लोकनृत्य स्पर्धा, पाककला स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा आणि पथनाट्य यांसारख्या सांस्कृतिक स्पर्धांही आयोजित करण्यात आल्या आहे.
मेळघाट रंगोत्सवातील विविध शासकीय सेवा आणि योजनांची माहिती देण्यात येणार असल्याने नागरिकांनी सहभागी होऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, धारणीच्या उपविभागीय अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी केले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा