सोमवार, १६ जून, २०२५

निम्न पेढी प्रकल्प बाधीतांना 101 कोटीचे सानुग्रह अनुदान मंजूर *पहिला टप्प्यात 57.50 कोटी रुपये प्राप्त *पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

अमरावती, दि. 16 : जिल्ह्यातील दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या निम्न पेढी प्रकल्पातील बाधितांना 101 कोटींचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यातील पहिल्या टप्प्यात 57 कोटी 50 लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने निधी प्राप्त झाला असून त्याचे वाटप होणार लवकरच होणार आहे. यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती येणार आहे. निम्न पेढी प्रकल्पातील पाच गावांच्या पुनर्वसनाला गती देण्यात आली आहे. या गावातील नागरिकांना हेक्टरी पाच लाख रुपये सानुग्रह निधी मिळावा यासाठी गेल्या दहा वर्षांपासून आंदोलने झाली. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रकरणी दखल घेत तातडीने याबाबत बैठक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या सहमतीने निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांना पाच लाख रुपयाचे सानुग्रह अनुदान मंजूर करून प्रकल्पाची वाट मोकळी करून दिली आहे. सानुग्रह निधी 5 गावातील 845 लाभार्थ्यांना मिळणार आहे. सध्या या प्रकल्पाला 101 कोटी रुपये मंजूर झाले असून 57.50 कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेला आहे. निम्न पेढी प्रकल्पांतर्गत 2006-13 या कालावधीत सरळ खरेदी प्रक्रियेत एकूण 1 हजार 981 हेक्टर शेतजमीन संपादित करण्यात आली आहे. संपादित शेतजमीनीकरीता पाच लाख रूपये प्रति एकर सानुग्रह अनुदानाची मागणी करण्यात आली. याबाबत महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने यासंदर्भात अनेक बैठका घेण्यात आल्या. या बैठकीदरम्यान निम्न पेढी प्रकल्पात सुमारे 101 कोटी रूपयांचा सानुग्रह निधी प्राप्त झाला आहे. प्रथम टप्प्यात प्रकल्पग्रस्त क्षेत्रातील हातुर्णा, अळनगाव, गोपगव्हाण, कुंड खुर्द व कुंड सर्जापूर या 5 पुनर्वसित गावासाठी 57.50 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यामुळे आता निम्न पेढी प्रकल्पाला गती येणार आहे. अमरावती, भातकुली व मूर्तिजापूर तालुक्यातील गावांना निम्न पेढी प्रकल्पाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पात सुमो 3 हजार 200 हेक्टर क्षेत्र बुडीत राहणार आहे. या प्रकल्पामुळे 3 तालुक्यासह जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. भातकुली तालुक्यातील पाणीटंचाई दूर होऊन प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, तसेच भाजीपाला पिकांना फायदा होणार आहे. सानुग्रह निधीपोटी मिळालेला 57.50 कोटी रूपयांचा निधी प्रशासकीय बाबी पूर्ण करून वितरीत करण्यात येणार आहे. सदर निधी पालकमंत्री बावनकुळे यांच्या पुढाकाराने प्राप्त झाला आहे. सानुग्रह अनुदान वितरीत करण्याची कारवाई जलसंपदा विभागातर्फे करण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्तांनी तातडीने पुनर्वसीत गावात स्थलांतरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा