गुरुवार, ५ जून, २०२५

पी. एम. सुर्यघर मुक्त बिजली योजना ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ योजनेंतर्गत प्रस्ताव आमंत्रित · 16 जून अंतीम मूदत

अमरावती, दि. 5 : पी. एम. सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ या घटकाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाने ९ ऑगस्ट २०२४ रोजी ज्ञापन प्रसिध्द केले आहे. त्यानुसार राज्यात सदर योजना राबविण्याकरीता महाऊर्जा व महावितरणमार्फत प्रत्येक जिल्ह्यात एक गाव राज्यात २४ गावे महावितरण व १२ गावे महाऊर्जामार्फत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ म्हणून विकसित याअनुषंगाने अमरावती विभागातील पाच जिल्ह्यापैकी अमरावती जिल्ह्यातील एक गाव महाऊर्जामार्फत विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी अमरावती जिल्ह्यातील पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. अशी माहिती महाऊर्जाचे अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रफुल तायडे यांनी दिली आहे. पी. एम. सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत मॉडेल सोलर व्हिलेज या योजनेच्या संर्वांगीण व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती (DLC) दि.२९ मे रोजी गठीत करण्यात आली असून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन अधिकारी, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत हे या समितीचे सदस्य असून विभागीय महाव्यवस्थापक, महाऊर्जा हे या समितीचे सदस्य सचिव आहे. मॉडेल सोलर व्हिलेज निवडीबाबत पुढीलप्रमाणे निकष केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय मंत्रालयाव्दारे निश्चित करण्यात आले आहे. १) जिल्ह्यातील निवड केलेले गाव हे महसूल गाव असावे व त्याची लोकसंख्या जनगणनेनुसार किमान ५ हजारापेक्षा जास्त असावी. २) स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या गावांमध्ये स्पर्धेच्या कालावधी दरम्यान जास्तीत जास्त विविध अपारंपारिक ऊर्जा साधने/सौर उपकरणे आस्थापित करणे गरजेचे आहे. सौर उपकरणांमध्ये पी.एम. सुर्यघर योजनेंतर्गत जास्तीत जास्त घरांवर सोलर रुफ टॉप प्रकल्प उभारणी करणे तसेच पी.एम. कुसुम योजनेंतर्गत जास्तीत जास्त सौर पंप अथवा इतर विकेंद्रीत अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प आस्थापित करणे गरजेचे आहे. व या अनुषंगाने या सर्व अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पांची क्षमता १० मेगा वॅट पर्यंत असणे अपेक्षित आहे. ३) याकरीता सी.एस.आर.निधी, विभागाचा निधी किंवा जिल्हास्तरीय निधी व इतर उपलब्ध असलेल्या निधीचा वापर करता येईल. ४) अग्रणी बँकेमार्फत वैयक्तिक लाभार्थ्याला सौर प्रकल्प उभारणीकरीता बँकेच्या पात्रता निकषानुसार कर्ज उपलब्ध होऊ शकेल. ५) स्पर्धेतील विजेत्या गावाचा सविस्तर प्रकल्प अहवाल महाऊर्जातर्फे तयार करण्यात येईल व प्राप्त होणाऱ्या एक कोटी ऐवढ्या केंद्रीय वित्त सहाय्यामधून गावाला पुढीलप्रमाणे गावातील कामे करता येईल गावासाठी सामुदायिक सौर प्रकल्प (बी.ई.एस.एस.) किंवा इतर प्रकल्प, एन आर एल एम बचत गटांसाठी विविध सौर प्रकल्प, गावातील शासकीय ईमारतींचे सौर विद्युतीकरण, सौर आधारित व इतर प्रकल्प, सौर कृषी पंप, इतर सौर अधारित तंत्रज्ञानावर असलेले अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प, बचत गट/प्राथमिक स्तरावरील सहकारी संस्था/डेअरी/मत्स्योद्योग प्रकल्प इत्यादी प्रकल्पासाठी ९० टक्के अर्थ सहाय्य दिल्या जाईल. या अनुषगांने अमरावती जिल्ह्यातील उपरोक्त निकषानुसार पात्र असेलल्या गावांकडून दि. १६ जून २०२५ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी महाऊर्जा विभागीय कार्यालय,अमरावती दुरध्वनी/भ्रमणध्वनी क्र.०७२१ २६६१६१०/८६६९९११०११ तसेच ई-मेल domedaamravati@mahaurja.com वर संपर्क साधावा किंवा कार्यालयास प्रत्यक्ष भेट देण्यात यावी, असे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल व. तायडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा