विभागीय आयुक्तांनी घेतला
विविध क्रीडा सुविधांचा आढावा
अमरावती, दि. 14 : विभागीय क्रीडा संकूल येथे बास्केटबॉल, मल्लखांब, टेनिस खेळांचा सरावासाठी खेळाडूंना सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्या. रनिंग ट्रॅकच्री दुरुस्ती, वुडनकोर्टची दुरुस्ती तसेच देखभाल करण्यात यावी. अशा सुचना विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत दिल्या. बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक गणेश जाधव यांच्यासह समितीतील सदस्य उपस्थित होते.
या बैठकीमध्ये विभागीय क्रीडा संकुलामध्ये खेळाडुंसाठी विविध क्रीडा सुवीधांच्या उभारणीस विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली. यामध्ये 400 मीटर धावनपथाचे नुतनीकरण, खेळाडुसांठी प्रसाधनगृह, संपूर्ण आऊटडोअर स्टेडीयममध्ये पब्लीक ॲड्रेस सांऊड स्स्टिीम, खेळाडुंसाठी पिण्याचे पाण्याची सुविधा, बॉस्केटबॉल मैदानास रिटेनींग वॉल बांधकाम करणे, रुफटॉप सोलर यंत्रणेची उभारणी करणे, एअर कुलींग नुतनीकरण, कॅफेटेरीयाची उभारणी करणे त्याच प्रमाणे खेळाडुंसाठी लॉकरची व्यवस्था करणे इ. बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.
****