शुक्रवार, ८ जानेवारी, २०२१

11 रोजी विभागीय लोकशाही दिन

 

11 रोजी विभागीय लोकशाही दिन

              अमरावती दि. 8 : दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने दि. 11 जानेवारी 2021 रोजी (सोमवार) विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड-19 चा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने अर्जदारांना कार्यालयात बोलवून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन अर्जदारांना छोट्या संख्येच्या गटात समक्ष बोलावून विभागीय लोकशाही दिनात स्वीकृत अर्ज निकाली काढण्यात येतील.

            जेथे सार्वजनिक ग्रामपंचायत निवडणूकीची आचारसंहिता लागू असेल तेथून जनतेकडून नेमणूका, अनुदान, आर्थिक कर्जे किंवा आर्थिक सहाय्य इत्यादी बाबतचे अर्ज स्विकारता येणार नाही, असे गजेंद्र बावणे, उपआयुक्त (सा.प्र), अमरावती यांनी कळविले आहे.

00000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा