राष्ट्रीय मतदार दिन
निर्भयपणे मतदान करुन लोकशाही बलशाली करु
-
जिल्हाधिकारी
शैलेश नवाल
अमरावती,
दि. 25 : मजबूत लोकशाही असलेले राष्ट्र म्हणून भारताची संपूर्ण जगात ओळख आहे. लोकशाहीवर
निष्ठा व्यक्त करणारी कृती म्हणजे मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे होय. निर्भयपणे मतदान
प्रक्रियेत सहभागी होऊन आपण लोकशाही अधिक बलशाली बनवू. त्यामुळे कुणाच्याही दबावाखाली
न येता, आमिषाला बळी न पडता मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी
शैलेश नवाल यांनी नवमतदार युवक-युवतींना केले.
आज 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना
लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितिन व्यवहारे,
उपजिल्हाधिकारी निवडणूक श्रीमती वर्षा पवार, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसिलदार
संतोष काकडे, नायब तहसिलदार सुनिल रासेकर, संदीप टांक, प्रविण देशमुख, दिनेश बढीये
यांच्यासह बडनेरा मतदार संघाचे मतदान केंद्र अधिकारी उपस्थित होते.
नवीन मतदारांना ओळखपत्राचे वाटप
18
वर्षावरिल मतदान नोंदणी केलेल्या युवक-युवतींना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ओळखपत्र
वितरीत करण्यात आले व गुलाबपुष्प देऊन नवमतदारांचा गौरव करण्यात आला. युवा मतदारांमध्ये
अबरार खान अजीज खान, सैय्यद नाजीम, रुपेश शेंडे, शितल मेश्राम, दादाराव शिरसाठ, शुभम
सोंळके, केताली माहोरे, नंदीनी खाडे, आनंद गवळी, राहुल ढवळे, मोनीका म्हात्रे, समीश्रा
टाले यांना मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना
पारदर्शक व निर्भयपणे मतदान करण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे असे सांगुन शुभेच्छा
दिल्या.
निवडणूक
प्रक्रियेत चोखपणे आपली जबाबदारी पार पाडऱ्यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र
व गुलाबपुष्प देवून जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला. बडनेरा मतदार संघातील सागर अठोर,
सरोज शेगोकार, अमीत घिमे, सतीश शिरसाठ, वैशाली भोरे व मोहम्मद सलीम या मतदान केंद्रस्तरीय
अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देवून गौरव केला. यावेळी सर्व विभागाचे
अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा