विद्यार्थ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर
शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करावे
अमरावती दि. 7 : सामाजिक न्याय विभाग
व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यावतीने महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जातीच्या
विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, विजाभजच्या विद्यार्थ्यांसाठी
मॅट्रीकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, इमावच्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती
शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व विमाप्रच्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायीक पाठ्यक्रमाशी
संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजना राबविण्यात येतात.
सन 2020-21 वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर
नविन व नुतनीकरण योजनांचे अर्ज भरण्याची सुविधा माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत दि.
3 डिसेंबर 2020 पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात
देखील सदर डीबीटी पोर्टलद्वारे पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती, निर्वाह
भत्ता, शिक्षण फी परिक्षा फी व इतर अनुज्ञेय फी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर
थेट वितरीत केली जाणार आहे. त्याकरीता विद्यार्थ्यांनी आपले आधार क्रमांक आपल्या बँक
खात्याशी संलग्नीत करुन घेणे आवश्यक आहे.
याद्वारे सर्व संस्थांच्या/महाविद्यालयांसाठी
प्राचार्यांना सुचित करण्यात येते की, ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल
दि. 3 डिसेंबर 2020 पासून सुरु करण्यात आलेले आहे. त्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावे.
विहीत वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधीत महाविद्यालयांची
राहील. महाडीबीटी संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी/महाविद्यालयांनी अर्ज भरण्याचे आवाहन
विजय साळवे, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, अमरावती यांचेमार्फत करण्यात येत
आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा