बेरोजगार, शिकाऊ उमेदवारांसाठी
मंगळवारी भरती मेळावा
अमरावती दि. 13 : औद्योगिक प्रशिक्षण
संस्थेच्या मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रातर्फे अमरावती येथील औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेत मंगळवारी, दि. 19 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बेरोजगार आणि शिकाऊ
उमेदवारांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या
मेळाव्यासाठी आयटीआय उत्तीर्ण आणि आयटीआयमध्ये (Appear) प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी
आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या अंशकालीन प्राचार्या
एम. डी. देशमुख यांनी केले आहे.
भरती मेळाव्यात 19 ते 28 वर्ष वयोगटातील
आयटीआय उर्त्तीण उमेदवारांनी सहभागी व्हावे. या मेळाव्यात पुणे येथील पियाजिओ व्हेकल
प्रायव्हेट लिमीटेडतर्फे फिटर, पेन्टर, डिझेल मेकॅनिकल, मोटर मेकॅनिकल, ऑटो टेक, वेल्डर,
ऑटो मेकॅनिक, टर्नर, स्टिल मेटल, ट्रॅक्टर मेकॅनिकसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून निवड
करण्यात येतील.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा