बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

परदेशात शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी 25 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे

                                                 -परदेशात शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी

विद्यार्थ्यांनी 25 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे

 

 अमरावती, दि. 18: राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता यावे यासाठी सन 2021-22 या वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे. परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात दिनांक 25 ऑगस्ट  पर्यत सादर करावे. विद्यार्थ्यांना विहीत अर्जाचा नमुना कार्यालयीन वेळेत विनामुल्य प्राप्त होईल.

             विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठीचा विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेवून, परिपुर्ण माहिती भरुन व त्यासोबत आवश्यक कागदपत्र प्रमाणित प्रतीसह सादर करावे. अर्ज करण्याकरीता आवश्यक असलेली पात्रता अटी व शर्ती प्रकल्प अधिकारी, धारणी तसेच अपर आयुक्त आदिवासी विकास, अमरावती यांच्या कार्यालयातील सुचना फलकावर उपलब्ध असल्याचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                                                 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा