इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक
मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध
अमरावती,दि.2: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी इयता बारावीची परीक्षा कोविड -19 च्या प्रादुर्भावामुळे
उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे रद्द करण्यात
आली. तत्पूर्वी सन 2021 परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या सर्व विद्यार्थ्याना उच्च माध्यमिक
शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत दि. 3 एप्रिल 2021 रोजी ऑनलाइन प्रवेशपत्र देण्यात
आलेली आहेत. त्यानुसार सर्व उच्च माध्यमिक शाळांनी, कनिष्ठ महाविद्यालयांनी सर्व विद्यार्थ्याना
त्यांचे बैठक क्रमांक अवगत करुन दिले असून काही विद्यार्थ्याना त्यांचे बैठक क्रमांक
अवगत किंवा उपलब्ध झालेले नसल्यास अशा विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या https:/mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करुन दिलेली आहे.
याबाबत मंडळाच्या संकेतस्थळावर दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करुन अशा विद्यार्थ्यानी
आपले बैठक क्रमांक उपलब्ध करुन घ्यावेत, असे अमरावती विभागीय मंडळाचे वरीष्ठ अधिक्षक
किन्नाके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा