सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

रिक्त पदांच्या निवड यादी संदर्भात आक्षेप 11 ऑगस्ट पर्यंत लेखी कळवावे

 

                           रिक्त पदांच्या निवड यादी संदर्भात आक्षेप

                              11 ऑगस्ट पर्यंत लेखी कळवावे

अमरावती, दि. 9 : जिल्हा हिवताप कार्यालया अंतर्गत कार्यक्षेत्रातील गट-क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात दि. 22 फेब्रुवारी 2019 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. शासन धोरणानुसार रिक्त पदाच्या 50 टक्केच्या अनुषंगाने जाहिरातीत नमुद करण्यात आलेल्या पदाची लेखी परिक्षा दि. 28 फेब्रुवारी 2021 रोजी घेण्यात आली.

या लेखी परिक्षेचा अंतिम निकाल दि. 3 ऑगस्ट 2021 रोजी www.aroga.maharashtra.gov या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय व जिल्हा हिवताप कार्यालयातील सुचना फलकावर पात्र उमेदवारांची निवड यादी प्रसिध्दी करण्यात आली आहे.

निवड यादीसंदर्भात आक्षेप असल्यास दि 11 ऑगस्ट पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यत कार्यालयात लेखी कळवावे असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.शरद जोशी यांनी कळविले आहे.

 

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा