श्रीक्षेत्र
धारगड व जटाशंकर यात्रा रद्द
अमरावती, दि. 18: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संभाव्य
तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ञांनी दिला आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या सर्व नियमांचे
पालन करणे अनिवार्य आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सर्व प्रकारची
धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, पुजा करावयाची ठिकाणे बंद राहतील. सालाबादप्रमाणे
होणारी श्री क्षेत्र धारगड येथे श्रावण महीन्यानिमित्त होणारी यात्रा व जटाशंकर
तथा मांगेरी महादेव मंदीर दर्शन रद्द करण्यात आले आहे.
चिखलदरा
तालुक्यातील मौजा धारगड येथील प्राचीन शिव मंदीर परिसरात श्रावण महीन्यातील यात्रा
यावर्षी रद्द करण्यात येत आहे. नागरिकांनी जंगलामध्ये अवैधरित्या प्रवेश करु नये व
प्रशासनास सहकार्य करावे. जंगलामध्ये कोणीही अवैधरित्या प्रवेश करत असेल तर
त्याच्या जिवीताची जबाबदारी संबधितावर राहील व त्यांच्यावर वन्यजीव अधिनियम 1972
अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. यादरम्यान नागरिकांनी सहकार्य
करावे असे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे आकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक एस.
नवकिशोर रेड्डी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा