*20 ऑगस्टपर्यंत अर्ज करावे
लागणार
अमरावती, दि. 10 : भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील (आयआयएचटी) सन 2021-22 या शैक्षणिक सत्राकरिता राज्यातील युवकांना संधी आहे. या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी युवकांना 20 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहे.
भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील यावर्षीच्या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता 13, तर वेंकटगिरीकरीता 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी वस्त्रोद्योग प्रादेशिक उपायुक्त, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज दि. 20 ऑगस्ट 2021 पर्यंत मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज संबंधित वस्त्रोद्योग प्रादेशिक उपआयुक्त यांच्याकडे सादर करावे लागणार आहे.
प्रवेश अर्जाचा नमुना व इतर माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर अर्जाचा नमुना सर्व वस्त्रोद्योग प्रादेशिक उपायुक्त यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.
विदर्भातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग प्रादेशिक उपायुक्त, नागपूर, प्रशासकीय इमारत क्रमांक 2, आठवा माळा, बी-विंग, सिव्हील लाईन, नागपूर, 440001 दूरध्वनी क्रमांक 0712-2537927 यांच्याकडून प्राप्त करुन घ्यावे. तसेच अर्जाचा नमुना व विहित पात्रता कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे, असे नागपूर येथील वस्त्रोद्योग प्रादेशिक उपायुक्त स. ल. भोसले यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा