गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

दहावी, बारावीचे विद्यार्थी विलंब शुल्काने पुरवणी परिक्षेची आवेदनपत्र प्राप्त करु शकतील

                                                  दहावी, बारावीचे विद्यार्थी विलंब शुल्काने

पुरवणी परिक्षेची आवेदनपत्र प्राप्त करु शकतील

 

अमरावती, दि. 26 : शैक्षणिक वर्ष 2021 मध्ये सप्टेंबर,ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित व विलंब शुल्कासह ऑनलाईन परीक्षेची आवेदनपत्रे अतिविलंब/ विशेष अतिविलंब/ अतिविशेष अतिविलंब शुल्काने प्राप्त करुन घेता येणार आहे. इयत्ता दहावी व बारावी करीता अतिविलंब शुल्क भरण्याची अंतिम मुदत 27 ऑगस्ट,  विशेष अतिविलंब शुल्क भरण्याची 1 सप्टेंबर आणि अतिविशेष अतिविलंब शुल्क भरण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर 2021 निश्चित करण्यात आली आहे.

तसेच विलंब शुल्कानंतरही अतिविलंब शुल्काची आवेदनपत्रे ही कनिष्ठ महाविद्यालयाने ऑनलाईन पध्दतीने या www.maahsscboard,in संकेतस्थळावर भरुन त्यानंतर विद्यार्थी व प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह आवेदनपत्राची प्रत जमा करण्याच्या दिवसांपर्यत शुल्क मंडळात जमा करणे आवश्यक आहे. शुल्क प्राप्त झाल्यानंतरच अर्ज ग्राह्य धरण्यात येईल. सन 2021 च्या मुख्य परीक्षेसाठी इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत प्रविष्ठ झालेले विद्यार्थी यांनी सप्टेंबर, ऑक्टोबर 2021 च्या पुरवणी परीक्षेसाठी पुन:श्च आवेदनपत्र सादर केले असतील तर अशा विद्यार्थ्याकडून अतिविलंब, विशेष अतिविलंब, अतिविशेष अतिविलंब शुल्कासह कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये, असे अमरावती विभागीय मंडळाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहेत.

000000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा