अमरावती जिल्हयातील चंद्रभागा प्रकल्पात 72 टक्के पाणीसाठा
अमरावती,
दि. 24 : अमरावती जिल्हयात उर्ध्व वर्धा हा मोठा प्रकल्प असून शहानूर, चंद्रभागा, पूर्णा,
सपन आणि पंढरी हे पाच मध्यम प्रकल्प आहेत. उर्ध्व वर्धा प्रकल्पात आजपर्यंतचा
300.89 दलघमी पाणीसाठयाची नोंद झाली असून टक्केवारी 43.34 आहे. चंद्रभागा मध्यम प्रकल्पात
29.63 दलघमी पाणीसाठयाची नोंद करण्यात आली असून प्रकल्पातील पाण्याची टक्केवारी
71.83 आहे.
शहानूर
प्रकल्पातील उपयुक्त पाणी साठा 61.10 टक्के असून चंद्रभागा प्रकल्पात 71.83 टक्के,
पूर्णा मध्यम प्रकल्पात 61.80 टक्के, सपन प्रकल्पात 67.20 टक्के आणि पंढरी मध्यम प्रकल्पात
8.28 टक्के उपयुक्त पाणीसाठयाची नोंद झाली आहे.
उर्ध्व
वर्धा प्रकल्पात आजपर्यंतची जल संचय पातळी 342.50 मी. असून प्रकल्पात संकल्पीय पाणीसाठा
564 दलघमी आहे. प्रकल्पातील आजची जलपातळी 339.11 मी. एवढी आहे. मध्यम प्रकल्पातील शहानूर
येथे पूर्ण संचय पातळी 449.50 मी. असून आजची जलाशय पातळी 442 मी. आहे. चंद्रभागा प्रकल्पात
पाण्याची पूर्ण संचय पातळी 506.20 मी. असून जलाशय पातळी 402.25 मी आहे. पूर्णा प्रकल्पाची
जल संचय पातळी 452 मी. असून आजची जलाशयाची पातळी 448.65 मी. एवढी आहे. सपन प्रकल्पात
पूर्ण संचय पातळी 514 मी. आणि पंढरी प्रकल्पात 833.20 मी. असून सपन प्रकल्पात आजची
जलाशय पातळी 407 मी. तर पंढरी प्रकल्पात 422.76 मी. आहे.
आजचा
पाऊसाची नोंद निरंक असून पूर्णा प्रकल्पाच्या सांडव्या वरुन वाहणारा आजचा विसर्ग 62.93
घ.मी. असल्याची माहिती उर्ध्व वर्धा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी दिली.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा