शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

इयत्ता पहीली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये पाठ्यक्रम 25 टक्के कमी

 इयत्ता पहीली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक

वर्ष 2021-22 मध्ये पाठ्यक्रम 25 टक्के कमी 

 

अमरावती, दि.7 : शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहीली ते बारावी पर्यंतचा पाठ्यक्रम 25 टक्के कमी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने व्यवसाय शिक्षण व  प्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, २ स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम तसेच पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम यांचा पाठ्यक्रम २५ टक्के कमी क्रमप्राप्त आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये २५ टक्के कमी करुन पाठविण्यात आलेला पाठ्यक्रम सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षाकरिता राहील.असे  राज्य मंडळाचे  सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा