भातकुली व तिवसा
नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम
घोषीत
अमरावती, दि. 28 : सर्वोच्च
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आरक्षित असलेल्या जागा अनआरक्षित करण्यात आल्या
असून अमरावती जिल्ह्यातील भातकुली व तिवसा नगरपंचायतसाठी घेण्यात येणाऱ्या निवडणूक
कार्यक्रम घोषीत करण्यात आला असून निवडणूक
कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
भातकुली व तिवसा नगरपंचायत
निवडणूकांचे नामनिर्देशनपत्र आज बुधवार दिनांक 29 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11
वाजेपासून सोमवार दिनांक 3 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत राज्य निवडणुक
आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर भरावे. दिनांक 1 व 2 जानेवारी रोजी
अनुक्रमे शनिवार व रविवारी सुट्टी असल्याकारणाने नामनिर्देशन पत्र स्विकारले जाणार
नाही. भातकुली नगर पंचायतीसाठीचे नामनिर्देशनपत्र नगर पंचायत भातकुली येथे तर
तिवसा नगर पंचायतसाठीचे नामनिर्देशनपत्र तहसील कार्यालय येथे सादर करावे. दिनांक 4
जानेवारी 2022 रोजी सकाळी अकरा वाजल्यापासुन भातकुली व तिवसा नगरपंचायत
निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या
उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. भातकुली नगरपंचायतीचे नामनिर्देशनपत्रांची
छाननी व नामनिर्देशनपत्र मागे घेता येण्याची प्रक्रीया डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सभागृह, आठवडी बाजार येथे व तिवसासाठी तहसिल कार्यालय तिवसा येथे करण्यात येईल. नामनिर्देशनपत्रे
दिनांक 10 जानेवारी 2022 पर्यंत मागे घेता येईल. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची
ही अंतिम मुदत राहील. निवडणूक चिन्ह नेमुन देण्याची तसेच अंतिमरित्या निवडणूक
लढविणाऱ्या उमेदवारांची यादी उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या
लगतच्या दिवशी प्रसिध्द करण्यात येईल. मतदान
दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी सकाळी साडे सात वाजता पासून सायंकाळी साडे पाच
वाजेपर्यंत घेण्यात येईल. दिनांक 19 जानेवारी 2022 रोजी मतमोजणी व निवडणूकींचे
निकाल घोषीत करण्यात येईल. भातकुली नगरपंचायतीसाठी घेण्यात आलेल्या मतांची मोजणी
भातकुली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तर तिवसा नगरपंचायतीसाठी घेण्यात आलेल्या
मतांची मोजणी तिवसा तहसिल कार्यालयात करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी यांनी कळविले
आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा