शहरी भागातील पारधी
समाजाच्या महिलांकरीता
ईलेक्ट्रॅानिक ऑटो रिक्षा
वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी
15 डिसेंबर पर्यंत
अर्ज सादर करावे
अमरावती, दि. 2 : धारणी
येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यक्षेत्रातंर्गत पारधी समाजाच्या
विकासाकरिता विविध योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यातील शहरी भागातील पारधी
समाजाच्या (कमीत कमी इयत्ता नववी पास) महिलांकरिता ईलेक्ट्रॉनिक ऑटो रिक्षा वाटप
करणे हि योजना डीबीटी तत्वावर राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी
विहीत नमुन्यातील अर्ज धारणीच्या प्रकल्प कार्यालयात दि. 15 डिसेंबर पर्यत आवश्यक
त्या कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत सादर करावेत.
योजनेचे अर्ज वाटप व स्विकृती शासकीय
आश्रमशाळा गुल्लरघाट कॅम्प, बाभळी दर्यापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी
अंतर्गत सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालय मोर्शी, उपकार्यालय अपर आयुक्त कार्यालय
अमरावती व प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी येथे सुरु
आहे. अधिक माहिती साठी कार्यालयातील विकास शाखेशी 07226-224217 या दुरध्वनी
क्रमांकवर संपर्क साधावा.
समितीमार्फत अर्जाची छाननी करुन अंतिम लाभार्थ्यांची
निवड करण्यात येईल. लाभार्थी अर्जदारांचे लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त
झाल्यास त्यावेळी पात्र लाभार्थ्याची निवड ईश्वर चिठ्ठीद्वारे करण्यात येईल. या
योजनेचा लाभ घेण्याकरीता अर्जदाराकडे स्वत:चे तीन चाकी वाहन चालविण्याचा परवाना
(ड्रायव्हींग लायसन्स) असणे आवश्यक आहे. दि. 15 डिसेंबर नंतर दि. 31 डिसेंबर 2021
पर्यत हा परवाना प्रकल्प कार्यालयास जमा करण्याची मुभा राहील असे सहायक प्रकल्प
अधिकारी वैभव वाघमारे यांनी कळविले आहे.
a0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा