राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळावा 12 ते 17 डिसेंबरपर्यंत
सुशिक्षित
बेरोजगारांना रोजगाराच्या नव्या संधी
अमरावती,दि.१० : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता
विभागामार्फत सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या नव्या
संधी उपलब्ध करून देण्यासाठी 12 ते 17
डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या
राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये विविध नामांकित उद्योग-व्यवसाय सहभागी
होत आहेत. अधिकाधिक युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.
जिल्ह्यातील खाजगी आस्थापनांना सूचना
अमरावती जिल्ह्यातील खाजगी आस्थापनांनी या राज्यस्तरीय मेळाव्यात त्यांच्याकडे असलेली रिक्त
पदे अधिसूचित करावी व त्यांना आवश्यक असलेले कुशल-अकुशल मनुष्यबळाची मागणी ऑनलाइन
पद्धतीने www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर नोंदवावी. ऑनलाईन
मागणी नोंदविताना अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र, दूरध्वनी क्रमांक 0721-2566066 येथे
संपर्क साधावा. ऑनलाईन रोजगार मेळाव्यात राज्यातील सुमारे 25 हजार रिक्त जागा भरण्यात येणार
आहेत. त्यात अमरावती जिल्ह्यातील 537
रिक्त पदे अधिसूचित झालेली आहे .यासाठी इच्छुक सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर सहभाग नोंदवावा. ज्यांनी
अद्याप पर्यंत नोंदणी केलेली नाही अशा उमेदवारांनी प्रथम नोंदणी करून त्यानंतर
प्राप्त होणाऱ्या युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून यातील रिक्त पदासाठी आपल्या
शैक्षणिक पात्रतेनुसार व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज सादर करावा, असे आवाहन
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले
आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा