बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

दहावीची परीक्षा 15 मार्च व बारावीची परीक्षा 4 मार्च पासून

 

दहावीची परीक्षा 15 मार्च व

बारावीची परीक्षा 4 मार्च पासून

वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

 

अमरावती, दि. 22 : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा शैक्षणिक वर्ष 2022 मधिल मार्च महिन्यात घेण्यात येणार आहेत. त्या संदर्भातील नियोजन मंडळाने केले असून परीक्षेचे वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

इयत्ता बारावीची  (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम परीक्षा दिनांक 4 मार्च ते दिनांक 30 मार्च 2022 पर्यंत आयोजित करण्यात आली असून इयत्ता दहावीची परीक्षा दिनांक 15 मार्च ते दिनांक 4 एप्रिल 2022 पर्यंत घेण्यात येणार आहे. परीक्षेबाबतचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच इतर माध्यमातून प्रसारीत झालेले वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरु नये. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल. असे राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

                                                          000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा