मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

दहावी परीक्षेचे अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

 

दहावी परीक्षेचे अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

अमरावती, दि. 7 : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचा मार्फत सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL Database वरुन ऑनलाइन पध्दतीने तसेच पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र  प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजने अंतर्गत व तयार विषय घेवून, आयटीआयचे विद्यार्थ्यांनी आपली आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने दि.12 डिसेंबर  ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत व विलंब शुल्कासह दि.21 ते दि.28 डिसेंबर 2021 या कालावधीत भरावयाची होती. परंतु आवेदनपत्रे भरताना माध्यमिक शाळांना तांत्रिक व इतर अडचणी येत असल्यामुळे आवेदनपत्रे भरण्यास 18 नोव्हेंबर ते 26 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. 18 नोव्हेंबर ते 6 जानेवारी 2022 पर्यंत माध्यमिक शाळांनी चलनाद्वारे बँकेत शुल्क भरावे. विलंब शुल्कासह 27 डिसेंबर ते 1 जानेवारी 2022 पर्यंत भरावे. परीक्षा देणऱ्या विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in  या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे. विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फत भरावी. आवेदनपत्रे सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारे भरण्यात यावे, असे राज्य मंडळाचे  सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा