शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा 16 जानेवारीला

 

भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्रात

प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा 16 जानेवारीला

अमरावती, दि.7 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या, नागरी सेवा परीक्षा-२०२२ च्या पुर्व प्रशिक्षणाकरीता विनामुल्य प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षेकरीता ऑनलाईन (Online) पध्दतीने www.siac.org.in आणि www.gpiasamt.org या संकेतस्थळाद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. दिनांक 7 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावे तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क दिनांक 9 जानेवारीपर्यंत भरावे. अभिरुप चाचणी (Mock Test) दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत होणार असून सामाईक ऑनलाईन प्रवेश परीक्षा दिनांक 16 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. प्रवेशाकरीता घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल 20 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

मुलाखतीचा कार्यक्रम परीक्षेच्या निकालानंतर वरील संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, (Online) अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्राच्या  संचालक डॉ. संगिता पकडे यांनी कळविले आहे.

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा