महाडीबीटी प्रणालीवरील 2020-21 शैक्षणिक वर्षात
विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि.१7
: माहिती व तंत्रज्ञान
विभागामार्फत सन २०२०-२१ वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित
जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्र प्रवर्गाकरिता नूतनीकरणाचे अर्ज सादर करण्याकरिता
पुन्हा 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
संस्था व सर्व महाविद्यालयांनी ऑनलाईन
नूतणीकरणाचे अर्ज नव्याने करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल दिनांक ३१ जानेवारी २०२२
पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे. त्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नूतणीकरणाचे
अर्ज तसेच विद्यार्थ्यांनी लॉगिनकडे त्रुटि पूर्ततेकरिता SEND BACK केलेले अर्जाची
माहीती संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून त्वरित त्रुटिपूर्तता करून जिल्हा
लॉगिन वर पाठवावी. महाविद्यालयांनी विहित वेळेत अर्ज विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घ्यावे.
असे समाज कल्याणच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी कळविले आहे. सामाजिक न्याय व
इतर मागास बहुजन कल्याण विभाग
यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीमार्फत विविध योजना राबविण्यात येतात. भारत
सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, शिक्षण फी
परीक्षा योजना, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना,
व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता
योजनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे
श्रीमती केदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा