दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी खाजगीरित्या परिक्षा
देण्यासाठी
18 डिसेंबर पर्यत ऑनलाईन अर्ज सादर करावे
अमरावती, दि.१5
: शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरून परीक्षेस प्रविष्ट होण्याची
सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे..
शैक्षणिक वर्ष २०२२ च्या दहावी
बारावी परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज
ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्याचा १६ सप्टेंबर
ते ०६ डिसेंबर 2021 हा कालावधी दिनांक पर्यंत
मुदतवाढीने निश्चित करण्यात आला होता. परंतु आता विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज
विलंब व अतिविलंब शुल्काने ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्याच्या तारखा पूढीलप्रमाणे
निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
विलंब शुल्क शंभर रुपये स्विकारुन माध्यमिक शाळांनी आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी
विलंब शुल्क प्रती विद्यार्थी पंचविस रुपये स्विकारुन 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज सादर
करावे. माध्यमिक शाळांनी/कनिष्ठ महाविद्यालयांनी अति विलंब शुल्क प्रती विद्यार्थी
वीस रुपये स्विकारुन दिनांक 19 ते 24 डिसेंबर 2021 पर्यंत विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज सादर करावे.
खाजगी विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीसाठी
नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच सादर करावयाचे आहेत. कोणाचाही ऑफलाईन अर्ज
स्विकारला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी दहावीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://form17.mh-ssc.ac.in या व बारावीसाठी अर्ज सादर
करण्यासाठी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या
सूचना संकेतस्थळावर मराठी/इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज
भरण्याकरीता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास व्दितीयप्रत व प्रतिज्ञापत्र,
आधारकार्ड, स्वतःचा पासपोर्ट आकारातील
फोटो सादर करणे आवश्यक आहे, असे अमरावती विभागीय मंडळाच्या सहायक सचिव डॉ. जयश्री
राऊत यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा