‘आयटीआय’मध्ये आज संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शन
अमरावती, दि. 29 - औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण मॉडेल्सची निर्मिती व प्रोत्साहनासाठी संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शन उद्या दि. 30 नोव्हेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सर्वांसाठी खुले राहील.
याच उपक्रमाचे विस्तारित स्वरूप म्हणून दि. 2 डिसेंबरला जिल्हास्तरीय प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
राज्याचे संचालक दिगंबर दळवी यांच्या पुढाकाराने व अमरावती विभागाचे सहसंचालक प्रदीप घुले यांच्या मार्गदर्शनानुसार कौशल्य विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के. एस. विसाळे व संस्थेचे प्राचार्य संजय बोरकर यांनी केले आहे.
यांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, वीजतंत्री, वेल्डिंग, टीडीएम,आयटी आदी अभियांत्रिकी व्यवसायातील, तसेच ड्रेस मेकिंग, फॅशन टेक्नॉलॉजी, कोपा यासारख्या बिगर अभियांत्रिकी व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पनेतून अनेक मॉडेल तयार केले आहेत. ते प्रदर्शनात पहावयास मिळतील. प्रदर्शनाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. बोरकर व उपप्राचार्य राजेश चुलेट यांनी केले आहे.
०००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा