इयत्ता
दहावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र
संकेतस्थळावर उपलब्ध
अमरावती, दि. 21 (विमाका) : इयत्ता दहावीच्या शैक्षणिक वर्ष मार्च-एप्रिल २०२२ मध्ये होणाऱ्या परिक्षांचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध
करून देण्यात येत आहेत.
सर्व
माध्यमिक शाळांना मार्च - एप्रिल २०२२ च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या
www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शुक्रवार, दिनांक 18 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी
1.00 वाजल्यापासून school login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील.
मार्च-एप्रिल
2022 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी दहावी परीक्षेची
ऑनलाईन प्रवेशपत्र प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यावीत. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम
बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्याव्या.
या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क
साधावा असे अमरावती विभागीय मंडळाचे सचिव उल्हास नरड यांनी कळविले आहे.
0000000
वृत्त क्र. 73 दिनांक: 22 फेब्रुवारी 2022
दहावी
व बारावीच्या
परीक्षेसाठी
विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत
अमरावती, दि. 21 (विमाका) : शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये कोविड-19 मुळे उद्भवलेल्या
परिस्थितीमुळे सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी व इयत्ता दहावीची परीक्षा
या नियमित परीक्षांकरिता तसेच पुरवणी परीक्षांकरिता विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबतची
अट सन 2022 या वर्षापुरतीच खासबाब म्हणून क्षमापित करुन विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रविष्ठ
होण्यासाठी मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार ही बाब विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील
सर्व मान्यताप्राप्त शाळा व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या निदर्शनास
आणून देण्यात यावी असे अमरावती विभागीय मंडळाचे सचिव उल्हास नरड यांनी कळविले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा