दहावीची
परीक्षा 15 मार्च तर बारावीची 4 मार्च पासुन सुरू
अमरावती, दि. 2 : मार्च-एप्रिल
2022 मध्ये इयत्ता दहावी व बारावी लेखी व अन्य परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहे.
इयत्ता बारावीची लेखी परीक्षा
दि. 4 मार्च ते 30 मार्च पर्यंत, प्रात्यक्षिक परीक्षा दि. 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत,
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम इयत्ता बारावी परीक्षा लेखी परीक्षा दि. 4 मार्च
ते दि. 30 मार्च 2022 पर्यंत, प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी दि. 14 फेबुवारी ते
गुरुवार दि. 3 मार्च, इयत्ता दहावीची लेखी परीक्षेचा कालावधी दि. 15 मार्च 2022 ते
4 एप्रिल 2022 राहणार आहे. या परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची
आवेदनपत्रे निर्धारित मुदतीत घेऊन नियमानुसार कोणताही पात्र विद्यार्थी
परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
यासाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्य), यांना आपल्या
स्तरावरुन सूचना निर्गमित करण्यात याव्यात. परीक्षेसाठी निश्चित केलेल्या परीक्षा
केंद्रावर विद्युत जोडणी, पंखे, दिवे व इतर भौतिक सुविधा असणे आवश्यक असून,
परीक्षा कालावधीत अखंडित विद्युत पुरवठा राहण्यासाठी जनरेटर/इन्हर्टर सुविधा असणे
आवश्यक आहे. परीक्षा कालावधीत विभागीय मंडळ स्तरावर नियंत्रण कक्षाची सुविधा
निर्माण करण्यात यावी. हा नियंत्रण कक्ष सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत कार्यरत
राहील. असे राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा