महाडीबीटी
संकेतस्थळावर अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
विद्यार्थ्यांनी 15 फेब्रुवारी
पर्यंत अर्ज सादर करावे
अमरावती दि. 9:- सामाजिक न्याय विभागाच्यावतीने
महाडीबीटी प्रणालीवर सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी केंद्र पुरस्कृत भारत सरकार शिष्यवृत्ती
करीता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे नविन अर्ज भरण्याकरिता व अर्जाचे नुतणीकरण करण्यासाठी दिनांक 15 फेब्रुवारी 2022पर्यंत
मुदतवाढ देण्यात आली आहे. दिनांक 15 फेब्रुवारी पर्यंत . htt://mahadbtmahait.gov.in हे पोर्टल विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी सुरू राहणार आहे.
सद्यस्थितीत htt://mahadbtmahait.gov.in या शासनाच्या महाडीबीटी संकेत स्थळावर विद्यार्थ्यांचे अर्ज
नोंदणीकृत झाले नाहीत. याबाबत महाविद्यालयांत विद्यार्थ्यांसाठी सुचना फलक लावुन
विहीत मुदतीत नोंदणीकृत अर्ज सादर करण्याची कार्यवाही
करावी. तसेच पात्र अर्जदारांनी आपले अर्ज नोंदणीकृत करून ऑनलाईन महाविद्यालयांकडे सादर करावेत व महाविद्यालयांनी हे ऑनलाईन अर्ज
समाज कल्याण विभागाकडे सादर करावेत. शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अंतर्गत येणा-या
विविध योजनांचे अर्ज व अर्जाचे नुतणीकरणासाठीचे प्रस्ताव
महाविद्यालयांनी दिनांक 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांचेकडे सादर करावे,
असे समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा