बुधवार, २ फेब्रुवारी, २०२२

अनुसूचित जमातीच्या युवकांसाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन 20 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करावे

अनुसूचित जमातीच्या युवकांसाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन

                           20 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती, दि. 2 : एकात्मिक आदिवासी कार्यालयाकडून केंद्रशासनाकडून प्राप्त निधीतून मंजूर योजनांचे वित्तीय मापदंड, लक्षांक आणि अंमलबजावणीच्या पध्दतीनुसार योजना राबविण्याचे निर्देश आहेत. त्याबाबत त्याअनुषंगाने अकोला,वाशिम,बुलडाणा या जिल्ह्यांकरिता ज्या योजना राबविणे प्रस्तावित आहे अशा योजनांमध्ये निकषाधारीत बदल करुन सुधारीत मार्गदर्शक सूचना अमरावती येथील अपर आयुक्त आदिवासी कार्यालयात सादर करण्यात आलेल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांना मंजूरी मिळण्याच्या अधिन राहून खालिल योजनांकरीता आदिवासी लाभार्थी / प्रशिक्षणार्थीचे विहित नमुण्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.

अनुसूचित जमातीच्या दारिद्र रेषेखालील लाभाथ्यांना जंगलातील वनोपज मालावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण देणे (अनिवासी) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी वनहक्क कायद्याअंतर्गत लाभ मिळालेल्या जमिनीचे प्रमाणपत्र (वन पटा)किंवा शेतीचा 7/12,आठ अ.,दारिद्रयरेषेचे कार्ड, जातीचा दाखला (उपविभागीय अधिकाऱ्याने दिलेला असावा), आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, 2 छायांकित फोटो, या पुर्वी लाभ न घेतल्याचे प्रतिज्ञापत्रसादर करणे आवश्यक आहे.

आदिवासी युवकांना सुरक्षा रक्षकाचे प्रशिक्षण देणे (अनिवासी), , आदिवासी युवकांना अग्निशमन व सुरक्षादल विषयक प्रशिक्षण देणे(अनिवासी) आणि आदिवासी युवकांना वार्डबॉयचे प्रशिक्षण देणे (अनिवासी) या योजनेचा लाभ घेण्याकरीता पूढील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

दारिद्रयरेषेचे कार्ड, जातीचा दाखला (उपविभागीय अधिकायाने दिलेला असावा), 10वी/12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, 2 छायांकित फोटो, या पूर्वी लाभ न घेतल्याचे प्रतिज्ञापत्र,प्रशिक्षणार्थी किमान वय 18 ते 35 असावे, शाररिक पात्रता-उंची 165 से.मी व वजन 50 कि.ग्रॅ. छाती न फुगवता 81 सेमी फुगवुन 86.5 सेमी असावे.

या योजनांकरिता इच्छुक अनुसूचित जमातीच्या विदयार्थी/लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज (प्रकल्प अधिकारी एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प अकोला न्यु राधाकिसन प्लॉट माहेश्वरी भवन जवळ महसूल भवन, अकोला) येथे सादर करावेत. विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक 20 फेब्रुवारी 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत शासकीय सुटीचे दिवस सोडून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला येथून प्राप्त करुन परिपूर्ण भरून सादर करावे. तसेच योजनांच्या मार्गदर्शक सुचनांना मंजूरी मिळण्याचे  अधिन राहून योजना राबविण्यात येत असल्या कारणाने जर अपवादात्मक परिस्थित योजना राबविणे शक्य नसल्यास झाल्यास कार्यालयात प्राप्त अर्ज मंजूर करण्याचे किंवा रद्द करण्याचे अधिकार प्रकल्प अधिकारी यांनी राखून ठेवले आहे, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी कळविले आहे.

000000

 

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा