धनगर समाजातील
महिला नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी योजना
पात्र
लाभार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन
-
प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त
सुनील वारे
अमरावती दि. 14 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत स्टँडअप इंडिया योजनेत धनगर
समाजातील महिलांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. विभागातील पाचही
जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रादेशिक समाजकल्याण
उपायुक्त सुनील वारे यांनी केले आहे.
धनगर समाजातील नवउद्योजक महिला
लाभार्थ्यांना सहाय्य करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया या योजनेत लाभ घेण्यास
पात्र ठरलेल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या नवउद्योजकांना प्रकल्प
किमतीच्या 15 टक्के मार्जिन मनी उपलब्ध करुन दिला जातो. त्याच धर्तीवर भटक्या
जमाती-क या प्रवर्गातील नवउद्योजकांना आर्थिक सहाय्य केले जाते.
अशी
आहे तरतूद
या योजनेत प्रकल्प किमतीच्या 75 टक्के निधी
बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या कर्जाद्वारे उभा करावा लागतो. लाभार्थ्यांने
भरावयाच्या 25 टक्के निधीपैकी केवळ 10 टक्के निधी लाभार्थ्याला द्यावा लागतो.
उर्वरित 15 टक्के निधी मार्जिन मनी म्हणून शासनाद्वारे उपलब्ध करुन दिला जातो. या
योजनेचा लाभ केंद्र शासनाच्या स्टँडअप
इंडिया योजनेसाठी पात्र ठरलेल्या भटक्या जमाती- क यश प्रवर्गातील नवउद्योजकांना
अनुज्ञेय राहील.
इच्छूक व पात्र लाभार्थ्यांनी या
विकासात्मक योजनेचा लाभ घ्यावा. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ बुलडाणा
व वाशिम या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांशी पात्र व्यक्तींनी
संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त श्री. वारे यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा