ग्रामीण
भाग स्वयंपूर्ण करण्यासाठी विकासकामांना गती
- राज्यमंत्री बच्चू कडू
अचलपुर ग्रामीण
भागात 15 कोटी 45 लक्ष रुपयांच्या
निधीतुन विविध
विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
अमरावती,
दि. 11 :
नागरिकांसाठी आवश्यक सोई-सुविधांच्या निर्मितीने ग्रामीण भाग स्वयंपूर्ण
होण्यास मदत होईल. त्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती प्रक्रिया पुर्ण करण्यावर भर
देण्यात येईल. ग्रामीण भागात रस्ते निर्मिती, काँक्रिटीकरण, अद्ययावत सुविधायुक्त
शाळा, रुग्णालये, सभागृहे, इमारती इत्यादींची निर्मिती, परिसराचे सौंदर्यीकरण
इत्यादी कामांमधून ग्रामीण भागांचा विकास घडवुन आणण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध
करुन देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांनी
दिली.
अचलपूर
तालुक्यातील ग्रामीण भागात आज (दि.11) विविध शासकीय योजनेअंतर्गत प्राप्त 15 कोटी 45 लक्ष रुपयांच्या निधीतुन श्री कडू
यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
जिवनपूरा येथे 1
कोटी 40 लक्ष रुपयांच्या निधीतुन विविध विकास कामांचे भूमिपूजन
अचलपूर
नाका ते मालवेशपूरा गेट रस्ता रुंदीकरणाचे, डांबरीकरणाचे काम 75 लक्ष रुपयांच्या
निधीतुन करण्यात आले. जिवनपूरा येथे बाल गणेश मंदिर, गजानन मंदिर, शीतला माता
मंदीर परिसरात 28 लक्ष रुपयांच्या निधीतुन निर्माण करण्यात आलेल्या सभागृहाचे
लोकार्पण श्री कडू यांनी केले. बाहेकर यांच्या घरापर्यंत, नागोबा मंदीर ते दत्त
मंदिर पर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण,
श्रीरामबाबा मंदिर येथे रंगकाम विद्युत फीडिंग व शौचालयाची निर्मितीचे काम, विठ्ठल
मंदिर परिसराचे सौंदर्यीकरणाचे 37 लक्ष रुपयांच्या निधीतुन विकासकांमांचे भूमिपूजन
आज श्री कडू यांनी केले.
बुंदेलपुरा येथे
29 लक्ष रुपयांच्या निधीतुन विकासकामे
येथिल
कलंका मंदिराच्या मागील सभागृहाचे 5 लक्ष, हनुमान मंदिर परिसरात 10 लक्ष रुपये
निधीतुन सभागृहाचे काम, भोई समाजासाठी 10 लक्ष रुपये निधीतुन सभागृहाची निर्मिती,
सिद्धेश्वर मंदिर परिसरात सभागृहाचे 4 लक्ष रुपयांच्या निधीतुन बांधकामाचे
भूमिपूजन श्री कडू यांनी आज केले.
विलायतपुरा येथे
72 लक्ष निधीतुन विकासकामे
येथिल दानाखोरी प्रभागातील विठ्ठल मंदिरापर्यतच्या
रस्त्याचे बळकटीकरण 4 लक्ष निधीतुन, हनुमान मंदिरासमोर, आदीवासी समाजासाठी सभागृह 25 लक्ष रुपये निधीतुन,
महादेव मंदीर, मनकर्ण संस्थान, पोळा चौक, कलिका माता मंदीर ते विलापुर मज्जित
पर्यंत रस्त्याचे काम व विलायतपुरा येथिल राजु सोनवणे यांच्या घरासमोरील परिसराचे
सौंदर्यीकरणाचे 43 लक्ष रुपयांतुन भूमिपूजन आज करण्यात आले.
बावनीपूरा/सुलतानपूर
येथे 30 लक्ष निधीतुन विकासकामे
येथिल भोंडे यांच्या घरासमोर न.प. च्या खुल्याजागेवर,
सुल्तानपुरा, अचलपूर व बालाजी मंदिर
परिसरात सभागृहाच्या निर्मितीच्या 30 लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे
भूमिपूजन आज करण्यात आले.
हिरापूर येथे 71 लक्ष निधीतुन व बागवानपूरा येथे 13 लक्ष निधीतुन विविध कामे करण्यात
येणार असल्याचे श्री कडू यांनी सांगितले. येथिल हनुमान मंदीर हिरापूरा, अचलपूर
येथे सभागृह बांधकाम करणे 12 लक्ष निधीतून, 8 लक्ष रुपयांच्या निधीतून हिरापूर
येथे सभागृह बांधकाम करणे , 35 लक्ष रुपये
निधीतून शादीखाना निर्माण करणे , हिरापूर येथिल दुर्गापूर रस्ता कॉक्रीटीकरण करणे
6 लक्ष, हिरापूर येथील लाल हनुमान मंदिराचे बाजूला लादिकरण व चैन्लिंग फेन्सिंगचे
काम, हनुमान मंदिर ते नंदू भूस्कते रोडवर लादिकरणाचे 10 लक्ष रुपयांच्या काम, 5
लक्ष रुपयांच्या निधीतून अमृतकर ते जर्फाबदी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण
करणे , येथील खोलापूरे ते मेन रोड पर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे 8 लक्ष
रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमीप आज श्री कडू यांनी केले.
दुल्हागेटे येथे
132 लक्ष निधीतुन विकासकामे तर बिलनपूरा
येथे 25
लक्ष
निधीतुन व बियाबानी येथे 15 लक्ष निधीतुन व आदी
विकासकामांना सुरुवात
72 लक्ष निधीतून दुल्हा गेट ते श्रीकृष्ण पूल ते गांधी पूल
मुख्य रस्ता बांधकाम लांबी 1.800 किमी , 60 लक्ष निधीतून दुल्हा गेट ते चावलमंडी
चौक ते गांधी पूल मुख्य रस्ता बांधकामाचे
भूमिपूजन,येथिल शनी मंदिर सभागृह बांधकाम
12 लक्ष निधींतून, बिलनपूरा अचलपूर येथे श्री.देशमुख ते पंचवटे यांच्या
घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे 5 लक्ष निधीतून, डॉ. सालकर यांच्या घरामागील
रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे 8 लक्ष निधीतून,येथिल मुशाब्बर पठाण यांच्या घरासमोर
खुल्या जागेवर सभागृह बांधकाम करणे 10 लक्ष, डॉ. जाहिद दवाखान्यासमोर खुल्या
जागेवर सभागृह बांधकाम करणे 5 लक्ष.
दिलदारपूरा येथिल बुध्देगा चौक ते बजरंगबली महाराज
दिलदारपूरा पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे 4 लक्ष, बुध्देखा चौक येथिल विविध ठिकाणी
लादिकरण 10 लक्ष, लोहार लाईन येथिल हत्तीवले रामंदिर परिसरामध्ये स्वचालाय बांधकाम
करणे 2 लक्ष. फरमानपूरा येथिल जहीर बास यांचे घरासमोर इमामवाडा सभागृह बांधकाम
करणे 10 लक्ष, देवळी चौक येथिल उपजिल्हा रुग्णालय ते जीवनपुरा गेट रस्याभाचे
डांबरीकरण करणे 35 लक्ष. पाटीलपूरा येथिल नागोबा मंदिर सभागृह बांधकाम करणे 15
लक्ष. चावलमंडी येथिल हदाले यांचे घरी सांत्वन भेट. माळीपूरा नामदारगंज येथिल सलाम
भाई ते मुस्तफा मास्टर ते हुसेन खान यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण करणे 5 लक्ष.
नामदारगंज अचलपूर येथे लाकोडे ते माकोडे यांच्या घरापर्यंत डांबरीकरणे करणे 5
लक्ष. बेगमपूरा येथिल आंबेडकर पुतळा बेगमपुरा येथे सभागृह बांधकाम करणे 12 लक्ष.
तहसिल येथिल मुस्लीम कब्रस्थान येथे आवारभिंत व शेड बांधकाम करणे 4 लक्ष.
अब्दालपूरा येथिल सभागृह बांधकाम करणे 9 लक्ष. ठिकरीपूरा येथिल गुणवंत महाराज
सभागृह बांधकाम करणे 12 लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन श्री कडू
यांनी आज केले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा