मंगळवार, २५ जून, २०२४

शेतीशी निगडीत शंका व प्रश्नांच्या निरसनासाठी टोल फ्री कक्ष स्थापित संपर्कासाठी 1800 233 400 टोल फ्री क्रमांक तर व्हॉटसॲपसाठी 9822446655 क्रमांक जारी

शेतीशी निगडीत शंका व प्रश्नांच्या निरसनासाठी टोल फ्री कक्ष स्थापित संपर्कासाठी 1800 233 400 टोल फ्री क्रमांक तर व्हॉटसॲपसाठी 9822446655 क्रमांक जारी अमरावती, दि. 25 : शेतकऱ्यांचे शेतीशी निगडित शंका व प्रश्नांचे समर्पक निरसन व मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागातर्फे टोल फ्री कक्ष स्थापित करण्यात आला असून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कक्ष सुरू राहील. टोल फ्री कक्षामध्ये संपर्कासाठी 1800 233 400 हा लॅन्डलाईन व 9822446655 हा मोबईल व्हाट्सअप क्रमांक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे. शेतकरी बांधवांनी उपरोक्त दोन्ही संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे. टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 संपूर्ण वर्षभर सुरू राहणार असून खते, बियाणे, कीटकनाशके यांची खरीप व रब्बी हंगामातील किंमत, उपलब्धता, गुणवत्ताबाबत शंकांचे निरसन त्यावर विचारता येईल. कृषी विभागांतर्गत येणारे विषय मृदा संधारण विस्तार, सांख्यिकी प्रक्रिया व नियोजन, फलोत्पादन, निविष्ठा व गुणनियंत्रण, कृषी यंत्रीकिकरण इत्यादी बाबतच्या शंकाचे निरसन यावर केल्या जाईल. जिल्ह्यांच्या कृषी विभागाचे संपर्क क्रमांक, कृषी विद्यापीठांचे संपर्क क्रमांक आवश्यकता असल्यास संबंधितांना यावर घेता येईल. टोल फ्री क्रमांक 9822446655 टोल फ्री क्रमांक 9822446655 हा केवळ संदेश पाठवण्यासाठी असून खरीप हंगाम व रब्बी हंगामात कृषी निविष्ठाची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबतच्या तक्रारी नोंदवताना शेतकऱ्यांनी आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील व्हाट्सअप वर पाठवणेसाठी उपलब्ध आहे. शेतकरी बांधवांनी सदर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून व मार्गदर्शन घेवून आपल्या शंकांचे निरसन करावे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा