गुरुवार, २७ जून, २०२४

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे 28 जूनला रोजगार व शिकाऊ भरती मेळाव

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे 28 जूनला रोजगार व शिकाऊ भरती मेळावा अमरावती, दि. 26 : भारतातील सर्वात प्रसिध्द कार उत्पादक सुझुकी मोटर गुजरात प्लांटकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती येथे 28 जूनला सकाळी 9 वाजता रोजगार तथा शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार तथा शिकाऊ मेळाव्यात जास्तीत जास्त आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी सहभागी व्हावे व नामांकित सुझुकी मोटर्स कंपनीत रोजगार मिळवण्यासाठी प्राप्त झालेल्या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन उपसंचालक संजय बोरकर तसेच सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार राजेश चुटले यांनी केले आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी शैक्षणिक पात्रता, वय पुढीलप्रमाणे- मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पुरुष उमेदवार हा इयत्ता दहावी किमान 40 टक्के गुणांनी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 23 वर्ष 11 महिने असणे आवश्यक असून मुलाखतीसाठी वर्ष 2017 ते 2023 मध्ये आय टी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.(फक्त पुरुष उमेदवार) फिटर, यांत्रिक मोटार गाडी, मशिनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशन, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, ऑटोमोबाईल्स, मेकॅनिक पेंटर जनरल, मेकॅनिक ट्रॅक्टर, मेकॅनिक डिझेल, टर्नर, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स, शिट मेटल वर्कर या ट्रेडकरिता मुलाखत होणार आहे. दहावी पास गुणपत्रिका, बोर्ड सर्टिफिकेट तीन प्रतीत, बारावी पास असल्यास बोर्ड सर्टिफिकेट 3 प्रतीत, शाळा सोडल्याचा दाखला तीन प्रती, आय. टी. आय. मार्कशिट प्रत्येक सेमिस्टरचे तीन, आधार कार्ड, पॅन कार्ड तीन प्रती झेरॉक्स, कलर फोटो नवीन काढलेला पाच कॉपी याप्रमाणे मुलाखतीसाठी आवश्यक मुळ कागदपत्रे व त्याच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे कळविण्यात आले आहे. 0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा