गुरुवार, २७ जून, २०२४

अमरावती आयटीआयमध्ये 1 जुलैला शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

अमरावती आयटीआयमध्ये 1 जुलैला शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा अमरावती, दि. 27 : जिल्ह्यातील सर्व आय. टी. आय. उत्तीर्ण व अंतिम वर्षामध्ये शिकत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती येथे संजिव ऑटो पार्टर्स मॅन्युफॅक्चरर्स प्राव्हेट कंपनी, छत्रपती संभाजीनगर आणि राऊत ग्रुप्स, पुणे करीता 1 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याकरिता जिल्ह्यातील आय. टी. आय. फिटर, मशिनिस्ट, ग्रॅन्डर, टर्नर, मॅकनिक मशिन टुल मेन्टेनन्स व्यवसाय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थीनी या मेळाव्याला उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक एस. के. बोरकर तसेच सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार आर. जी. चुलेट यांनी केले आहे. 0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा