गुरुवार, २७ जून, २०२४

इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नियुक्ती

इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नियुक्ती अमरावती, दि. 26 : उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा, जुलै- ऑगस्ट 2024 करीता अमरावती विभागीय मंडळस्तरावर तीन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षेसंबंधी समस्यांचे निराकरण, मार्गदर्शन करण्यासाठी सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत समुपदेशक उपलब्ध राहणार असून संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी देण्यात आले आहेत. सदरची सुविधा दिनांक 16 जुलै ते 8 ऑगस्ट 2024 या कालावधी दरम्यान सुरु ठेवण्यात आली असून भ्रमणध्वनीवरुन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणाऱ्या समुपदेशकांची नावे व भ्रमणध्वनीक्रमांक पुढीलप्रमाणे देण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यासाठी समुपदेशक म्हणून चंद्रशेखर गुलवाडे (8007042402), अकोला व वाशिम जिल्ह्यासाठी समुपदेशक मनिष भडांगे (9422190678) तसेच यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यासाठी समुपदेशक म्हणून किशोर बनारसे (9422449345) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कार्यालयीन हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांक 0721-2662647 देण्यात आला आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधी काही समस्या किंवा मार्गदर्शन हवे असल्यास उपरोक्त भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाव्दारे करण्यात आले आहे. 0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा