गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५

पारशी नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. १४ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेला पारशी नूतन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नवरोज हा नूतन वर्षाचा पहिला दिवस उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती या त्रिसूत्रीचे स्मरण देतो. या मंगल प्रसंगी राज्यातील जनतेला आणि विशेषतः पारशी बंधू – भगिनींना नवरोझ तसेच पारशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हे वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो, असे राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा