शुक्रवार, १ मार्च, २०१९

शासकीय तंत्रनिकेतनचा अठरावा पदविका प्रदान समारंभ


शासकीय तंत्रनिकेतनचा अठरावा पदविका प्रदान समारंभ

विद्यार्थ्यांनी ज्ञान व कौशल्य आत्मसात केल्यावर
उद्योगांसाठी योगदान द्यावे
-         तंत्रशिक्षण सहसंचालक दत्तात्रय जाधव


            अमरावती, दि. 01 :  विद्यार्थ्यांनी पदविका परीक्षा उत्तीर्ण करुन आयुष्यातील महत्वाचा टप्पा पार केलेला असतो. परंतु त्यानंतरच त्याची खरी परीक्षा सुरु होते. उद्योग क्षेत्रात काम करत असताना विद्यार्थ्यांनी त्याकडे केवळ कमाईचे साधन म्हणुन न पाहता उद्योगांसाठी आवश्यक असणारे नेतृत्व गुण, संवाद कौशल्य, सतत शिकण्याची वृत्ती व समस्यांचे समाधान शोधण्याचे कौशल्य आदी गुण आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यामुळेच त्यांना उद्योग क्षेत्रातील जिवघेण्या स्पर्धेत टिकून राहता येईल. विद्यार्थ्यांनी नोकरीवर अवलंबुन न राहता स्वयं उद्योजक बनून इतरांसाठी रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असे आवाहन तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव यांनी आज केले.
शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे बुधवारी, दि. 27 फेब्रुवारी रोजी पदविका प्रदान समारंभात श्री. जाधव विद्यार्थ्यांना उद्बबोधन करतांना बोलत होते. अमरावती शासकीय तंत्रनिकेतन या स्वायत्त तंत्रशिक्षण संस्थेच्या  18 व्या प्रदान समारंभाचे आयोजन बुधवार दि. 27 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 3 वाजता करण्यात आले. या समारंभात उन्हाळी 2018 व हिवाळी 2018 या परिक्षांमधील अभियांत्रिकी पदविकेच्या विविध विद्याशाखांमधील एकुण 542 विद्यार्थी-विद्यार्थीनींना पदविका प्रदान करण्यात आल्या.
            सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, अमरावती तथा नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय जाधव यांचे अध्यक्षतेक्षाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या पदविका प्रदान समारंभात स्थापत्य अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, अणुविद्युत अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान व प्लॅस्टिक व पॉलीमर अभियांत्रिकी या शाखांच्या एकुण 542 विद्यार्थी-विद्यार्थीनींना मान्यवरांच्या हस्ते पदविका प्रदान करण्यात आल्या.
            दिक्षांत मिरवणुकीचे ज्ञानदंडासह सभागृहात समारंभपुर्वक आगमन झाल्यानंतर प्रमुख कार्यक्रमाची विधिवत सुरुवात झाली. त्यानंतर अध्यक्षांच्या हस्ते सरस्वती पुजन करण्यात आले. संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेन्द्र मोगरे यांनी आपल्‍या प्रास्तविक भाषणातुन संस्थेच्या शैक्षणिक व भौतिक प्रगतीचा आलेख सादर करतांनाच संस्थेतील विविध उपक्रमांबाबत व भविष्यातील योजनांबाबत माहीती दिली. विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतांनाच विद्यार्थ्यांनी स्वत:च्या विकासाबरोबरच देशाच्या व समाजाच्या विकासासाठी जोडुन घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            व्यासपिठावर सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, अमरावती तथा नियामक मंडहाचे अध्यक्ष डॉ. डी. व्ही. जाधव, शासकीय तंत्रनिकेतन, अमरावतीचे प्राचार्य डॉ. राजेन्द्र मोगरे, नियामक मंडळाचे सदस्य सर्वश्री डॉ. जी. आर. शेकापुरे, प्रा. पी. व्ही. सरोदे, डॉ. ए. बी. मराठे, किरण हातगावकर, सुरेश ठाकुर, जे. यु. बोडखे, व्ही. आय. लढ्ढा, संजय बांगर, किरण पातुरकर, डॉ. एस. डब्लयु. मोहोड, शैक्षणिक समन्वयक प्रा. पी. बी. उत्तरवार, परिक्षा नियंत्रक प्रा. एस. जे. गायकवाड, विभागप्रमुख सर्वश्री प्रा. एस. पी. पासेबंद, प्रा. ए. व्ही. उदासी, डॉ. एस. एस. भरतकर, प्रा. आर. पी. प्रांजळे, प्रा. एम. पी. गणोरकर, डॉ. पी. पी. करडे, प्रा. डी. आर. गांवडे, डॉ. एन. जी. कुळकर्णी, डॉ. एस. पी. बाजड, डॉ. आर. एन. काणे व कर्मशाळा अधिक्षक प्रा. व्ही. एस. पारसकर आदी यावेळी उपस्थित होते.
            शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळचे प्राचार्य डॉ. धर्मपाल शिंगाडे यांचेतर्फे त्यांच्या मातोश्री स्व. वंचळाबाई शिंगाडे यांच्या स्मरणार्थ उन्हाळी 2018 परिक्षेमध्ये सर्व विद्या शाखांमधुन प्रथम येणाऱ्या श्री. संकेत वर्धेकर, यंत्र अभियांत्रिकी द्वितीय पाळी यास रोख पारितोषिक रु. 1 हजार 500 रुपये, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येक विद्याशाखेतुन गुणानुक्रमे प्रथम व द्वितिीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे अनुक्रमे पंधराशे व एक हजार रुपयाचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
उन्हाळी 2018 परिक्षेत स्थापत्य अभियांत्रिकी विभागात : प्रथम पाळी प्रथम क्रमांक तावरे रोहीत प्रकाशराव व द्वितीय क्रमांक देशमुख कपिल अशोकराव, द्वितीय पाळी प्रथम क्रमांक वर्धेकर संकेत व द्वितीय क्रमांक यादगिरे राहुल नंदकिशोर, विद्युत अभियांत्रिकी विभागात : प्रथम क्रमांक चौधरी आकांक्षा मनोज व द्वितीय क्रमांक तायडे शिवम प्रकाशराव, अणुविद्युत अभियांत्रिकी विभागात : प्रथम पाळी प्रथम क्रमांक शेख अल्फीया आसिफ व द्वितीय क्रमांक ढगे राणी सोनाजी, द्वितीय पाळी प्रथम क्रमांक गुल्हाने अनुजा रमेशराव व द्वितीय क्रमांक बोबडे सुजित सुरेन्द्र, संगणक अभियांत्रिकी विभागात : प्रथम क्रमांक ताजी इंशिराह मुरान खान व द्वितीय क्रमांक उपाध्ये हर्षल मनोज व विधाले पियुष सतिष, माहिती तंत्रज्ञान विभागात प्रथम क्रमांक गौर खुशबु संजिवकुमार व शर्मा विप्रा विजय व द्वितीय क्रमांक निचत सृष्टी प्रकाश, प्लॅस्टिक व पॉलीमर अभियांत्रिकी विभागात प्रथम क्रमांक जिभकाटे विशाल रामभाऊे व द्वितीय क्रमांक गायकवाड स्वरुपा प्रल्हाद या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
            कार्यक्रमाचे संचालन प्रा. सी. एन. निकोसे व प्रा. डॉ. श्रीमती सादीया रझा यांनी केले. स्वागत गीत संस्थेतील विद्यार्थ्यीनींनी सादर केले. आभारप्रदर्शन स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. पी. पासेबंद यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेतील अधिकारी, कर्मचारी, पालक व विद्यार्थी विद्यार्थींनी बहुसंख्येने उपस्थित होते. पसायदानानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा