महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्ज
31 मार्च पर्यंत सादर करावे
अमरावती, दि.
22 : सन 2018-19 मध्ये शिष्यवृत्ती
योजनेचा लाभ अदा करण्यासाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरु केले आहे. सन 2018-19
या शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी पोर्टलवरील अनु जाती, विजाभज, इमाव व विमाप्र
प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या अर्जांना दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज मंजूर करता
यावेत यासाठी पोर्टलवर ज्या पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अथवा
विद्यार्थ्यांना हप्त्याचा लाभ अदा करण्यात आलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना
दुसऱ्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी महाविद्यालय स्तरावर दुसऱ्या हप्त्याचे टॅब
बटन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
हे अर्ज
मंजूरीसाठी महाविद्यालय स्तरावर 31 मार्चच्या आधी सहाय्यक आयुक्त यांच्याकडे
पाठविण्यात याव्यात.
दिनांक 31 मार्च 2019 च्या आधी हे ऑनलाईन अर्ज
आयुक्तयालयास सादर करावे असे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, अमरावती यांनी कळविले
आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा