कोषागारे कार्यालये
शनिवारी अखेरची देयके स्विकारतील
Ø आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचे
आवाहन
अमरावती, दि.
12 : आर्थिक वर्ष रविवारी संपणार असल्यामुळे सर्व कोषागारे मार्च अखेरीची देयके
शनिवारी स्विकारून या देयकांचे प्रदान करण्यात येणार आहे. जिल्हा कोषागार
कार्यालये आणि उपकोषागार कार्यालयात दि. 31 मार्च 2019 रोजी कोणतेही देयक स्विकारल्या जाणार नाहीत. त्यानुषंगाने देयके विहित मुदतीत
सादर करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन लेखा व कोषागारे संचालनालयाने केले आहे.
दि. 31 मार्च 2019 रोजी रविवार असल्याने शासकिय
कार्यालयांना सुट्टी आहे. या अनुषंगाने आर्थिक वर्षाअखेर निधी अखर्चित राहू नये, यासाठी जिल्हा कोषागार
कार्यालये आणि उपकोषागार कार्यालये दि. 30 मार्च, 2019 रोजी मार्चअखेरची देयके
स्विकारतील. तसेच प्रदानाची कामे पुर्ण करतील. तसेच दि. 30 मार्च, 2019 ही बिम्स (BEAMS) प्रणाली द्वारे प्राधिकारी पत्र (BDS) काढण्यासाठीची अंतिम तारिख
असणार आहे, याची सर्व आहरण व संवितरण
अधिकारी यांनी नोंद घ्यावी.
चालू आर्थिक वर्षात दि. 1 मार्च 2019 पूर्वी जिल्हा कोषागार कार्यालयाकडून
अथवा उपकोषागार कार्यालयाकडून आक्षेपित झालेली देयके दीर्घ काळापासून कोषागारात
पुन्हा सादर न केलेली सर्व देयके (उदा. प्रवास भत्ता देयके, आस्थापना विषयक पुरवणी देयके, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देयके, इ.) आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी दि. 20 मार्च 2019 पर्यंतच जिल्हा कोषागार कार्यालय, उपकोषागार कार्यालयात सादर करावीत. त्यानंतर या प्रकारणांची देयके
स्विकारली जाणार नाहीत. केवळ पुरवणी मागण्या (मार्च 2019) व सुधारित अंदाजपत्रकानुसार उपरोक्त
बाबींसाठी मंजूर झालेल्या अनुदानाचीच देयके दि.
20 मार्च 2019 नंतर कोषागारास सादर करता येणार आहे.
उपकोषागार कार्यालयात प्राप्त
होणारी देयके, या देयकांवर उपकोषागाराकडून
करावयाच्या कार्यवाहीस लागणारा अवधी आणि बँकेच्या कामाचा कालावधी पाहता उपकोषागार
कार्यालयात दि. 30 मार्च 2019 रोजी सायंकाळी 6 वाजल्यानंतर देयके स्विकृती बंद होणार आहेत. उपकोषागारस्तरावरील आहरण व संवितरण अधिकारी यांच्यातर्फे जिल्हा कोषागारात
देयके सादर करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन लेखा व कोषागारे सहसंचालक उ. ना.
सोनकांबळे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा