‘पर्यावरण स्नेही’ होळीसाठी सामाजिक
वनीकरणाचे आवाहन
अमरावती, दि. 19 : होळी सणाच्या
निमित्ताने करण्यात येणारी वृक्षतोड थांबावी, पर्यावरणाचा समतोल राखता यावा यासाठी
एक गाव एक होळी करावी. गावातील होळींची संख्या कमी करावी होळीच्या सणाचा आनंद
लुटावा असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. होळीसाठी
लाकुड, व गोवऱ्यांचा उपयोग न करता कचरा जाळावा. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी
साजरी करतांना रसायनांपासून बनविलेल्या रंगाचा उपयोग करुन नये. त्याएवेजी विविध
फळे, व फुलांचा रंग बनविण्यासाठी वापर करावा. रासायनिक पदार्थंनी बनविलेल्या रंगामुळे मानवी
त्वचा, व अवयव विविध आजारांनी बाधित होवू शकतात. काळा रंग ऑक्साईड पासून बनलेला असतो,
त्यामुळे मुत्रसंस्थेचे विकार, हिरव्या रंगातील कॉपर
सल्फेटमुळे डोळ्यांचे आजार, चांदीसारख्या रंगातील ॲल्युमिनियम ब्रोमाईड मुळे
कर्करोग, निळ्या रंगातील पार्शियन निळीमुळे त्वचेचे आजार व लाल रंगातील मर्क्युरी
सल्फाईटमुळे त्वचेचा कर्करोग होवू शकतो. निसर्गामध्ये पर्यावरण संतुलनाचा
महत्वाच्या कार्यात वृक्षांचे अत्यंत महत्वाचे स्थान आहे. नागरिकांनी होळी
निमित्ताने वृक्षतोड न करता याच वृक्षाचे पूजन करावे व निकोप आरोग्यासाठी धुळवडीला
नैसर्गिक रंगाचा वापर करावा असा संदेश सामाजिक वनीकरण विभागाने दिला आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा