बुधवार, १३ मार्च, २०१९

अमरावती विभागात 90 लाखांवर मतदार


अमरावती विभागात 90 लाखांवर मतदार
अमरावती, दि. 13 : अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील मतदारांची संख्या 90 लाख 38 हजार 747 असून यात 46 लाख 94 हजार 980 पुरुष तर 43 लाख 40 हजार 468 महिला मतदारांचा समावेश आहे.
विभागात अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ-वाशिम असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. विभागातील लोकसभा मतदारसंघ आणि त्यात समाविष्ट विधानसभा मतदारसंघ पुढीलप्रमाणे आहेत.
अमरावती (अ. जा. राखीव) : अमरावती, बडनेरा, तिवसा, दर्यापूर, मेळघाट व अचलपूर.
अकोला : अकोट, बाळापूर, अकोला-पश्चिम, अकोला-पूर्व, मुर्तिजापूर, रिसोड.
यवतमाळ-वाशिम : राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, पुसद, कारंजा, वाशिम.
बुलढाणा : बुलढाणा, चिखली, सिंदखेड-राजा, महेकर, खामगाव, जळगाव जामोद.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व धामणगाव (रेल्वे) हे विधानसभा मतदारसंघ शेजारच्या वर्धा लोकसभा मतदारसंघात, यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी हे चंद्रपूर तर उमरखेड हे हिंगोली लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा व वाशिम हे यवतमाळ तर रिसोड हे अकोला लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे.
विभागातील  90 लाख 38 हजार 747 मतदारांमध्ये सर्वाधिक मतदार अमरावती जिल्ह्यात 24 लाख सहा हजार 619 इतके आहेत, तर अकोला 15 लाख 58 हजार 544, यवतमाळ 21 लाख 28 हजार 163, बुलडाणा 20 लाख 10 हजार 468, वाशिम 9 लाख 34 हजार 549 अशी जिल्हा निहाय मतदार संख्या आहे.
अमरावती विभागात एकूण 10 हजार 143 मतदान केंद्र असणार आहेत. त्यांची जिल्ह्यानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. अमरावती दोन हजार 607, अकोला एक हजार 751, यवतमाळ दोन हजार 451, बुलडाणा दोन हजार 251, वाशिम एक हजार 43.
विभागात 48 हजार 371 कर्मचारी मतदान केंद्रावर असतील. त्याची जिल्हानिहाय संख्या अशी : अमरावती 13 हजार 476, अकोला सात हजार 4, यवतमाळ 12 हजार 460, बुलडाणा नऊ हजार 904, वाशिम पाच हजार 527.
विभागात 12 हजार 719 मतदान यंत्रे उपलब्ध झाली आहेत. अमरावती 3 हजार 383, अकोला 2 हजार 172, यवतमाळ 3 हजार 116, बुलडाणा 2 हजार 580, वाशिम एक हजार 468 मतदान यंत्रे जिल्हास्तरावर प्राप्त झाली आहेत. या यंत्रांसोबत यंदा व्हीव्हीपॅट यंत्रे उपयोगात आणली जाणार आहेत.
0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा