अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सैनिकी शाळेत
प्रवेशासाठी 24
एप्रिलला पूर्व परिक्षा
अमरावती, दि. 20 : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सैनिकी
शाळेत पाचव्या वर्गात प्रवेशासाठी 24 एप्रिलला पूर्व
परिक्षा घेण्यात येणार आहे.
यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अकोला एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अनुसूचित जमातीच्या
विद्यार्थ्यांना सैनिकी शाळेत पाचवीमध्ये
प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या
विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
यासाठीचे अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी
विकास प्रकल्प, अकोला यांचे कार्यालय आणि सैनिकी शाळेतून विनामुल्य
वाटप होईल. इतर कोणत्याही मार्गाचा अवलंब न करता कार्यालय आणि शाळेशी प्रत्यक्ष
संपर्क साधून प्रवेश अर्ज प्राप्त करावा. प्रवेश अर्ज प्राप्त
करण्याची अंतिम मुदत 24 एप्रिल 2019 आहे.
अकेाला
जिल्ह्यामध्ये नॅशनल मिलीटरी स्कूल गायगाव, ता. बाळापूर येथे 45 विद्यार्थी
क्षमता, वाशीम जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण सैनिकी
शाळा, सुपखेला,
ता. वाशिम येथे 45 विद्यार्थी क्षमता, बुलडाणा जिल्ह्यातील
राजीव गांधी मिलीटरी स्कूल, कोलखेड, ता. बुलडाणा येथे 90 विद्यार्थी क्षमता, राजमाता जिजाऊ
मुलींची सैनिकी शाळा, चांघई, ता. चिखली येथे 90 विद्यार्थी क्षमता या सैनिकी शाळांमध्ये दिनांक 24 एप्रिल 2019 रोजी 11 ते 1 वाजपर्यंत पूर्व परिक्षेचे आयोजन केले आहे.
पाचवी मध्ये
प्रवेश घेणारा विद्यार्थी अनुसूचित
जमातीचा असावा, विद्यार्थ्यांचे नावे सक्षम अधिकाऱ्याने
दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत
सादर करावी. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या
पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा 1 लाख इतकी असावी. विधवा, घटस्फोटीत, निराधार, परितक्त्या यांच्या मुला आणि मुलींची
प्राधान्याने निवड करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय-निमशासकीय नोकरदार नसावेत, अर्जासोबत विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात
यावे. खोटी माहिती सादर केल्याचे प्रवेश रद्द
करण्यात येईल, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी
विकास प्रकल्प, अकोला यांनी कळविले
आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा