हातमाग विणकरांसाठी विभागीय हातमाग कापड
स्पर्धा
अमरावती, दि. 12 : सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग
विभागातर्फे हातमाग विणकरांनी विणलेल्या उत्कृष्ठ हातमाग कापड नमुन्यांना
प्रोत्साहन देण्यासाठी हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी हातमाग विणकारांनी तयार केलेले नमुने दि. 16 मार्च 2019 पर्यत सादर करावे, असे आवाहन
करण्यात आले आहे.
विभागीय हातमाग कापड स्पर्धा 2018-19 चे आयोजन नागपूर येथील विभागीय
आयुक्त कार्यालयाचे सभागृह, जुने सचिवालय, सिव्हील लाईन्स्, नागपूर येथे करण्यात आले आहे. अमरावती आणि नागपूर विभागातील सर्व जिल्ह्याचे हातमाग विणकरांनी या स्पर्धेत
सहभाग नोंदवावा. यासाठी हातमाग विणकरांनी तयार केलेले नमुने प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, नागपूर या कार्यालयात दि. 16 मार्च 2019 पर्यंत सादर करावे, याबाबत अधिक
माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालय
किंवा प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, नागपूर यांच्या
कार्यालयात 0712-2537927 या क्रमांकावर संपर्क साधावा,
असे आवाहन प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, नागपूर तथा सदस्य सचिव, विभागीय हातमाग कापड स्पर्धा यांनी केले आहे.
0000000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा