जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू
अमरावती, दि.
20 : लोकसभा निवडणूक 2019 अनुषंगाने
सर्वत्र आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने राजकीय पक्षातर्फे
प्रचाराकरिता सभा व स्थानिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तसेच दि. 21 मार्च
2019 रोजी धुलीवंदन मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर
जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
यादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित
रहावी, यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)
3 लागू करण्यात आले आहे. या काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी
पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 16 ते 30 मार्च 2019 पर्यंत कलम
37 (1) व (3) लागू करण्यात येत आहे. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तिंविरुध्द
कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अपर
जिल्हा दंडाधिकारी यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा