मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०२०

शिक्षक मतदारसंघाच्या तिवसा मतदान केंद्राची पाहणी

 





शिक्षक मतदारसंघाच्या तिवसा मतदान केंद्राची पाहणी

* विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून सूचना

अमरावती, दि. 24 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी दि. 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात 77 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्यानुषंगाने विभागीय आयुक्त पियूष सिंह आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज तिवसा येथील मतदानकेंद्राची पाहणी केली.

यावेळी तहसिलदार वैभव फरतारे, नायब तहसिलदार दत्तात्रय पंधरे आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्त पियूष सिंह आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तिवसा येथे मतदान होणाऱ्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय आणि तालुका क्रिडा संकुल येथील सोयीसुविधांची भेट देऊन पाहणी केली. मतदान सुरळीत आणि योग्य पद्धतीने होण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणेला सूचना केल्या. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचा आढावा त्यांनी या भेटी दरम्यान घेतला. शिक्षक मतदारसंघाच्या मतदान कक्षातील प्रत्येक बाबींची त्यांनी माहिती जाणून घेत मार्गदर्शन केले.

00000

 

 शिक्षक मतदारसंघाच्या तिवसा मतदान केंद्राची पाहणी

* विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून सूचना

अमरावती, दि. 24 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी दि. 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात 77 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्यानुषंगाने विभागीय आयुक्त पियूष सिंह आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज तिवसा येथील मतदानकेंद्राची पाहणी केली.

यावेळी तहसिलदार वैभव फरतारे, नायब तहसिलदार दत्तात्रय पंधरे आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्त पियूष सिंह आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तिवसा येथे मतदान होणाऱ्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय आणि तालुका क्रिडा संकुल येथील सोयीसुविधांची भेट देऊन पाहणी केली. मतदान सुरळीत आणि योग्य पद्धतीने होण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणेला सूचना केल्या. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचा आढावा त्यांनी या भेटी दरम्यान घेतला. शिक्षक मतदारसंघाच्या मतदान कक्षातील प्रत्येक बाबींची त्यांनी माहिती जाणून घेत मार्गदर्शन केले.

00000

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०

दिव्यांग, कोविडबाधितांसाठी टपाली मतपत्रिकेची सुविधा

 

दिव्यांग, कोविडबाधितांसाठी टपाली मतपत्रिकेची सुविधा

* शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक

* जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क करावा

अमरावती, दि. 19 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दिव्यांग व्यक्ती आणि कोविडबाधित मतदारांसाठी टपाली मतपत्रिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, यासाठी दि. 22 नोव्हेंबर पूर्वी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी दिली.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी दि. 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यातील दिव्यांग व्यक्ती आणि कोविडबाधित मतदार आपले मत टपाली मतदानाने नोंदवू शकतील. टपाली मतपत्रिका मिळण्यासाठीचा नमूना 12 डी दि. 22 नोव्हेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात देणे आवश्यक आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यामधील संबंधित मतदारांस मत नोंदविता यावे, यासाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांना नमूना 12 डी मिळण्याची सुविधा करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राची पाहणी

 






शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राची पाहणी

* केंद्रावर विविध सुविधा उपलब्ध होणार

अमरावती, दि. 19 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी दि. 3 डिसेंबर रोजी होणार आहे. ही मतमोजणी विलासनगरातील शासकीय धान्य गोदाम होणार आहे. या मतमोजणीच्या ठिकाणाची आज विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपायुक्त गजेंद्र बावणे, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, उपजिल्हाधिकारी वर्षा पवार, नायब तहसिलदार रवी महाले आदी उपस्थित होते.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची मतमोजणीसाठी दोन गोदामात होणार आहे. एका ठिकाणी सात टेबल राहणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे पथक या ठिकाणी कार्यरत राहणार आहे. तसेच मतमोजणीदरम्यान कर्मचाऱ्यांमध्ये योग्य अंतर राहण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी उपस्थित कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. मतमोजणीदरम्यान उपस्थित राहणाऱ्या माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष स्थापित करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना यांना येण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहे.

00000

 

 

 

बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२०

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 77 मतदान केंद्रे *दोन सहाय्यकारी मतदार केंद्रे

 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 77 मतदान केंद्रे

*दोन सहाय्यकारी मतदार केंद्रे

अमरावती, दि. 18  : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी विभागातील पाचही जिल्ह्यात 77 मतदान केंद्र असणार आहे. यात वाशिम आणि बुलडाणा येथे दोन सहाय्यकारी मतदार केंद्रे असणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी दिली.

धारणी तालुक्यात तहसिल कार्यालय, धारणी, चिखलदरा तालुक्यात तहसिल कार्यालय, चिखलदरा, दर्यापूर तालुक्यात तहसिल कार्यालय, दर्यापूर, अंजनगाव सूर्जी तालुक्यात तहसिल कार्यालय, अंजनगाव सुर्जी, अचलपूर तालुक्यात तहसिल कार्यालय, अचलपूर, अचलपूर तालुक्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय, परतवाडा, चांदूरबाजर तालुक्यात तहसिल कार्यालय, चांदूरबाजार, भातकुली तालुक्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय, भातकुली, अमरावती ग्रामीणसाठी गणेशदास राठी हायस्कुल, रुम नं. 4, अमरावती, अमरावती शहरसाठी जि. प. उर्दू मुलींची माध्य. शाळा, रुम नं. 2, अमरावती,  जि. प. उर्दू मुलींची माध्य. शाळा, रुम नं. 3, अमरावती,  जि. प. उर्दू मुलींची माध्य. शाळा, रुम नं. 4, अमरावती, जि. प. हायस्कुल मुलींची, कॅम्प अमरावती रुम नं. 2, अमरावती, जि. प. हायस्कुल मुलींची, कॅम्प अमरावती रुम नं. 3, अमरावती, जि. प. हायस्कुल मुलींची, कॅम्प अमरावती रुम नं. 4, अमरावती, गोल्डन किडस इंग्लीश स्कुल, अमरावती, रुम नं. 6, अमरावती, गोल्डन किडस इंग्लीश स्कुल अमरावती रुम नं. 7, अमरावती, गोल्डन किडस इंग्लीश स्कुल अमरावती रुम नं. 8, अमरावती, मोर्शी तालुक्यात तहसिल कार्यालय, मोर्शी, वरुड तालुक्यात तहसिल कार्यालय, वरुड, येथे दोन मतदान केंद्र, तिवसा तालुक्यात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय, तिवसा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात तहसिल कार्यालय, नांदगाव खंडेश्वर, चांदूररेल्वे तालुक्यात तहसिल कार्यालय, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे तालुक्यात तहसिल कार्यालय, धामणगाव रेल्वे, अकोट तालुक्यात तहसिल कार्यालय, अकोट, तेल्हारा तालुक्यात संजय गांधी  विभाग, गाडेगाव रोड, जुने तहसिल कार्यालय, तेल्हारा, बाळापूर तालुक्यात पंचायत समिती सभागृह, बाळापूर, अकोला ग्रामीणसाठी जि. प. आगरकर कनिष्ठ विद्यालय, खोली क्र. 2, अकोला, जि. प. आगरकर कनिष्ठ विद्यालय, खोली क्र. 3, अकोला, अकोला शहरसाठी राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, खोली क्र. 1, मुर्तिजापूर रोड, अकोला, राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, खोली क्र. 2, मुर्तिजापूर रोड, अकोला, राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, खोली क्र. 3, मुर्तिजापूर रोड, अकोला, जि. प. आगरकर कनिष्ठ विद्यालय, खोली क्र. 1, अकोला. पातुर तालुक्यात संजय गांधी विभाग, तहसिल कार्यालय, पातुर, बार्शिटाकळी तालुक्यात पंचायत समिती सभागृह, बार्शिटाकळी, मुर्तिजापूर तालुक्यात संजय गांधी विभाग, तहसिल कार्यालय, मुर्तिजापूर, जळगाव जामोद तालुक्यात प्रशासकीय ईमारत, तहसिल कार्यालय, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात प्रशासकीय ईमारत, तहसिल कार्यालय, संग्रामपूर, मलकापूर तालुक्यात प्रशासकीय ईमारत, तहसिल कार्यालय, मलकापूर, नांदूरा तालुक्यात खोली क्र. 3, तहसिल कार्यालय, नांदूरा, मोताळा तालुक्यात नविन ईमारत, तहसिल कार्यालय, मोताळा, शेगाव तालुक्यात तहसिलदार चेंबर, तहसिल कार्यालय, शेगाव, खामगाव तालुक्यात तहसिलदार चेंबर, प्रशासकीय ईमारत, तहसिल कार्यालय, खामगाव, चिखली तालुक्यात नवीन मिटींग हॉल, तहसिल कार्यालय, चिखली, बुलडाणा तालुक्यात महसुल विभाग, तहसिल कार्यालय, बुलडाणा, संजय गांधी विभाग, तहसिल कार्यालय, बुलडाणा, देऊळगाव राजा तालुक्यात तहसिल कार्यालय, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा तालुक्यात तहसिलदार चेंबर, तहसिल कार्यालय, सिंदखेड राजा, मेहकर तालुक्यात मिटींग हॉल, तहसिल कार्यालय, मेहकर, लोणार तालुक्यात मिटींग हॉल, तहसिल कार्यालय, लोणार, मालेगाव तालुक्यात तहसिल कार्यालय, मालेगाव, रिसोड तालुक्यात तहसिल कार्यालय, रिसोड, वाशिम तालुक्यात तहसिल कार्यालय, मिटिंग हॉल, वाशिम, तर तहसिल कार्यालय, संगणक कक्ष, वाशिम हे सहाय्यकारी मतदान केंद्र, मंगरुळपीर तालुक्यात तहसिल कार्यालय, मंगरुळपीर, कारंजा तालुक्यात तहसिल कार्यालय, कारंजा, मानोरा तालुक्यात तहसिल कार्यालय, मानोरा, दारव्हा तालुक्यात बचत भवन, दारव्हा, नेर तालुक्यात तहसिलदार कक्ष, तहसिल कार्यालय, नेर, बाभुळगाव तालुक्यात बैठक सभागृह, तहसिल कार्यालय, बाभुळगाव, यवतमाळ (ग्रामीण) तालुक्यासाठी बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ, यवतमाळ शहरासाठी तहसिलदार कक्ष, तहसिल कार्यालय, यवतमाळ, निवडणूक कक्ष, तहसिल कार्यालय, यवतमाळ, दिग्रस तालुक्यात आस्थापना कक्ष, तहसिल कार्यालय, दिग्रस, पुसद तालुक्यात निवडणूक कक्ष तहसिल कार्यालय, पुसद, तहसिलदार कक्ष, तहसिल कार्यालय, महागाव तालुक्यात तहसिलदार कक्ष, तहसिल कार्यालय, महागाव, उमरखेड तालुक्यात बैठक सभागृह तहसिल कार्यालय, उमरखेड, आर्णी तालुक्यासाठी बैठक सभागृह, तहसिल कार्यालय, आर्णी, घाटंजी तालुक्यात निवडणूक शाखा कक्ष, तहसिल कार्यालय, घाटंजी, कळंब तालुक्यात तहसिलदार कक्ष, तहसिल कार्यालय, कळंब, राळेगांव तालुक्‍यात निवासी नायब तहसिलदार कक्ष, तहसिल कार्यालय, राळेगाव, केळापूर तालुक्यात आस्थापना कक्ष, तहसिल कार्यालय, केळापूर, मारेगाव तालुक्यात सभागृह, तहसिल कार्यालय, मारेगाव, झरीजामणी तालुक्यात सभागृह, तहसिल कार्यालय झरीजामणी, झरीजामणी, वणी तालुक्यात महसूल भवन, तहसिल कार्यालय, वणी येथे ही मतदान केंद्रे असणार आहे.

00000

 

 

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

 

जिल्‍ह्यात कलम 37 (1)  व (3) लागू

 

अमरावती, दि. 17  : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 15 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2020 पर्यत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असेही अपर  जिल्हा दंडाधिकारी  यांनी कळविले आहे.

000000

 

 

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 28 जणांचे अर्ज वैध

 

शिक्षक मतदारसंघ निवडणुक बातमी







शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 28 जणांचे अर्ज वैध

* उमेदवारांकडून एकूण 65 अर्ज दाखल

अमरावती, दि. 13 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 28 उमेदवारांचे अर्ज छाननीअंती वैध ठरविण्यात आले आहे. या 28 उमेदवारांनी एकूण 65 अर्ज दाखल केले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी दिली. या छाननीवेळी निवडणूक निरीक्षक आनंद लिमये उपस्थित होते.

या निवडणुकीत छाननीनंतर अंतिमत: डॉ. नितीन रामदास धांडे (भारतीय जनता पक्ष), श्रीकांत गोविंद देशपांडे (शिवसेना), प्रा. अनिल मधुकरराव काळे (बळीराजा पार्टी), दिलीप आनंदराव निंभोरकर (लोकभारती), अभिजीत मुरलीधर देशमुख (अपक्ष), प्रा. अरविंद माणिकराव तट्टे (अपक्ष), अविनाश मधुकर बोर्डे (अपक्ष), आलम तन्वीर सैय्यद नियाज अली (अपक्ष), उपेंद्र बाबाराव पाटील (अपक्ष), प्रकाश बाबाराव काळपांडे (अपक्ष), सतीश माधवराव काळे (अपक्ष), किरण रामराव सरनाईक (अपक्ष), निलेश नारायण गावंडे (अपक्ष), महेश विष्णू डवरे (अपक्ष), दिपंकर सुर्यभान तेलगोटे (अपक्ष), प्रवीण उर्फ पांडुरंग नानाजी विधळे (अपक्ष), राजकुमार श्रीरामअप्पा बोनकिले (अपक्ष), चंद्रशेखर ऊर्फ शेखर मोहनराव भोयर (अपक्ष), डॉ. मुश्ताक अहेमद रहेमान शाह (अपक्ष), मोहंमद शकील अब्दुल अजीज कुरेशी (अपक्ष), प्रा. विनोद गुलाबराव मेश्राम (अपक्ष), शरदचंद्र कृष्णराव हिंगे (अपक्ष), श्रीकृष्ण बापूराव ठाकरे(अपक्ष), विकास भास्करराव सावरकर (अपक्ष), सुनील मोतीराम पवार (अपक्ष), सय्यद रिझवान सय्यद फिरोज (अपक्ष), संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे (अपक्ष), संजय वासुदेव आसोले (अपक्ष)  हे 28 उमेदवार राहणार आहेत.

या निवडणुकीसाठी 28 उमेदवारांनी 65 नामनिर्देशनपत्र दाखल केले. यापैकी संगिता शिंदे-बोंडे यांनर दाखल केलेल्या चार पैकी एक अर्ज नामंजूर करण्यात आला. उर्वरीत तीन अर्ज मंजूर करण्यात आल्याने त्यांनी उमेदवारी कायम आहे.  उर्वरीत 64 अर्ज मंजूर करण्यात आले असल्याची माहिती श्री. सिंह यांनी दिली.

00000

 

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवारांचे अर्ज

 

शिक्षक मतदारसंघ निवडणुक बातमी

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवारांचे अर्ज

* शेवटच्या दिवशी 20 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल

अमरावती, दि. 12 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज 20 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यामुळे निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या आता 28 एवढी झाली आहे.

            आज प्रा. अरविंद माणिकराव तट्टे (अपक्ष), राजकुमार श्रीरामअप्पा बोनकिले (अपक्ष), महेश विष्णू डवरे (अपक्ष), श्रीकांत गोविंद देशपांडे (शिवसेना), सय्यद रिझवान सय्यद फिरोज (अपक्ष), सुनील मोतीराम पवार (अपक्ष), अभिजीत मुरलीधर देशमुख (अपक्ष), चंद्रशेखर ऊर्फ शेखर मोहनराव भोयर (अपक्ष), किरण रामराव सरनाईक (अपक्ष), प्रा. अनिल मधुकरराव काळे (बळीराजा पार्टी), निलेश नारायण गावंडे (अपक्ष), आलम तन्वीर सैय्यद नियाज अली (अपक्ष), शरदचंद्र कृष्णराव हिंगे (अपक्ष), उपेंद्र बाबाराव पाटील (अपक्ष), दिपंकर सुर्यभान तेलगोटे (अपक्ष), संजय वासुदेव आसोले (अपक्ष), श्रीकृष्ण बापूराव ठाकरे, डॉ. मुश्ताक अहेमद रहेमान शाह (अपक्ष), अविनाश मधुकर बोर्डे (अपक्ष), मोहंमद शकील अब्दुल अजीज कुरेशी (अपक्ष) यांनी निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर केले.

           

या निवडणुकीत आतापर्यंत विकास भास्करराव सावरकर (अपक्ष), प्रवीण उर्फ पांडुरंग नानाजी विधळे (अपक्ष), सुनील मोतीराम पवार (अपक्ष), संजय वासुदेव आसोले (अपक्ष), अविनाश मधुकर बोर्डे (अपक्ष), शरदचंद्र कृष्णराव हिंगे (अपक्ष), संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे (अपक्ष), राजकुमार श्रीरामअप्पा बोनकिले (अपक्ष), प्रकाश बाबाराव काळपांडे (अपक्ष), दिलीप आनंदराव निंभोरकर (लोकभारती), डॉ. नितीन रामदास धांडे (भारतीय जनता पक्ष), चंद्रशेखर ऊर्फ शेखर मोहनराव भोयर (अपक्ष), सतीश माधवराव काळे (अपक्ष), प्रा. विनोद गुलाबराव मेश्राम (अपक्ष), प्रा. अरविंद माणिकराव तट्टे (अपक्ष), महेश विष्णू डवरे (अपक्ष), श्रीकांत गोविंद देशपांडे (शिवसेना), सय्यद रिझवान सय्यद फिरोज (अपक्ष), अभिजीत मुरलीधर देशमुख (अपक्ष), किरण रामराव सरनाईक (अपक्ष), प्रा. अनिल मधुकरराव काळे (बळीराजा पार्टी), निलेश नारायण गावंडे (अपक्ष), आलम तन्वीर सैय्यद नियाज अली (अपक्ष), उपेंद्र बाबाराव पाटील (अपक्ष), दिपंकर सुर्यभान तेलगोटे (अपक्ष), श्रीकृष्ण बापूराव ठाकरे, डॉ. मुश्ताक अहेमद रहेमान शाह (अपक्ष), मोहंमद शकील अब्दुल अजीज कुरेशी (अपक्ष) या 28 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

00000

 

 

बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नऊ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल

 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी

नऊ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल

अमरावती, दि. 11 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज नऊ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.

            आज राजकुमार श्रीरामअप्पा बोनकिले (अपक्ष), प्रकाश बाबाराव काळपांडे (अपक्ष), दिलीप आनंदराव निंभोरकर (लोकभारती), संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे (अपक्ष), विकास भास्करराव सावरकर (अपक्ष), डॉ. नितीन रामदास धांदे (भारतीय जनता पक्ष), चंद्रशेखर ऊर्फ शेखर मोहनराव भोयर (अपक्ष), शरदचंद्र कृष्णराव हिंगे (अपक्ष), सतीश माधवराव काळे (अपक्ष), प्रा. विनोद गुलाबराव मेश्राम (अपक्ष) यांनी निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर केले.

00000

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज 2 नामनिर्देशन पत्राची उचल

 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी

आज 2 नामनिर्देशन पत्राची उचल

अमरावती, दि. 11 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज 2 नामनिर्देशन पत्रांची उचल करण्यात आली.

            आज अर्जाची उचल केलेल्यांमध्ये डॉ. साबीर कमाल, संतोष रामसिंग जाधव यांचा समावेश आहे.

00000


मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२०

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल

 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी

पाच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल

 

अमरावती, दि. 10 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज पाच उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.

            आज सुनील मोतीराम पवार (अपक्ष), संजय वासुदेव आसोले (अपक्ष), अविनाश मधुकर बोर्डे (अपक्ष), शरदचंद्र कृष्णराव हिंगे (अपक्ष), संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे (अपक्ष) यांनी निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर केले.

00000

 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज 6 नामनिर्देशन पत्राची उचल

 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी

आज 6 नामनिर्देशन पत्राची उचल

 

अमरावती, दि. 10 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज 6 नामनिर्देशन पत्रांची उचल करण्यात आली.

            आज अर्जाची उचल केलेल्यांमध्ये गाजी जाहेरोश, संदीप मधुकर इंगोले, दिपनकर सुर्यभान तेलगोटे, महेश विष्णूपंत डवरे, अविनाश मधुकर बोर्डे, सय्यद रीजवान सय्यद फिरोज यांचा समावेश आहे.

00000   

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०

विधान परिषद निवडणूकीमध्ये मत नोंदविण्यासाठी सूचना

 

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2020

विधान परिषद निवडणूकीमध्ये मत नोंदविण्यासाठी सूचना

*मतदारांना पहिल्या पसंतीचे मत नोंदविणे आवश्यक

*केवळ अंकाचा स्वरूपात मत नोंदवावे लागणार

अमरावती, दि. 9 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक दि. 1 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे. या निवडणुकीत मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम लिहावा लागणार आहे. या मतदान प्रक्रियेविषयी मतदारांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी ‘मतदारांनी मत कसे नोंदवावे’ याबाबत भारत निवडणूक आयोगाने सुचना दिल्या आहेत.

या सूचनांमध्ये केवळ आणि केवळ मतपत्रिकेसोबत पुरवण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेननेच मत नोंदवावे. इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉल पेनचा वापर करण्यात येऊ नये. तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम नोंदवावा’ या रकान्यात ‘1’ हा अंक लिहून मत नोंदवावे.

निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत, तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर नोंदवू शकता. आपले पुढिल पसंतीक्रम उर्वरित उमेदवारांसमोरील रकान्यात 2, 3, 4 इत्यादीप्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे नोंदवू शकतात. एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकाच पसंतीक्रमाचा अंक नोंदवावा. तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवू नये. पसंतीक्रम हे केवळ 1, 2, 3 इत्यादी अशा अंकामध्येच नोंदविण्यात यावेत. ते एक, दोन, तीन इत्यादी अशा शब्दांमध्ये नोंदवण्यात येऊ नयेत.

पसंतीक्रम नोंदवताना वापरावयाचे अंक हे भारतीय अंकाच्या आंतरराष्ट्रीय स्वरुपात जसे 1, 2, 3 इत्यादी किंवा रोमन अंक स्वरुपात जसे I, II, III किंवा मराठी भाषेतील देवनागरी 1, 2, 3 या स्वरुपात नोंदवावे. मतपत्रिकेवर कोठेही आपली स्वाक्षरी, आद्याक्षरे, नाव किंवा अन्य कोणताही शब्द लिहू नये. तसेच मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नये. मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवताना टिकमार्क ‘ किंवा ‘X’ क्रॉसमार्क अशी खून करू नये. अशी मतपत्रिका अवैध ठरेल. आपली मतपत्रिका वैध ठरावी, याकरिता आपण पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदवावे अत्यंत आवश्यक आहे. अन्य पसंतीक्रम नोंदवणे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही.

या सुचनांचा अवलंब करुन मतदारांनी योग्य पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त यांनी केले आहे.

00000

 

 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दोन उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल

 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी

दोन उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल

अमरावती, दि. 9 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज दोन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.

            आज विकास भास्करराव सावरकर (अपक्ष), प्रवीण ऊर्फ पांडुरंग नानाजी विधळे (अपक्ष)  यांनी निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर केले.

00000

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज 6 नामनिर्देशन पत्राची उचल

 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी

आज 6 नामनिर्देशन पत्राची उचल

अमरावती, दि. 9 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी 6 नामनिर्देशन पत्राची उचल करण्यात आली.

            आज अर्जाची उचल केलेल्यांमध्ये किरण रामराव नाईक, सतिश माधव काळे, डॉ. नितीन धांडे, रामदास गंगाराम इंगळे, भाऊराव सरकटे, डॉ. नितीन गणपत चवाळे यांचा समावेश आहे.

00000

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करावे

 

शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी

बोंडअळीचे व्यवस्थापन करावे

        अमरावती, दि. 6 : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 10 टक्क्यापर्यंत होता परंतू त्यात वाढ होऊन ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तो 15 ते 20 टक्के झाला. नोव्हेंबर महिन्यात वातावरण गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक झाले आहे. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. नाकारता येत नाही. पिकाचे किडीपासून संरक्षणाकरीता विभागातील शेतकरी बांधवांनी उपाययोजना करण्यासाठी, असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथील किटकशास्त्रज्ञाच्या शेतकऱ्यांना उपाययोजना सांगीतल्या.

            प्रत्येक आठवड्यात 20 झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील मध्यम आकाराचे मध्यम पक्व झालेले बाहेरुन किडके नसलेले एक बोंड असे 20 बोंडे तोडून ते भुईमुंगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने टिचवुन त्यामधील किडक बोंड व अळ्याची संख्या मोजून, ती दोन किडक बोंड किंवा पांढुरक्या रंगाच्या लहान अळ्या आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी (5 ते 10 टक्के) समजून खालील सांगीतल्याप्रमाणे रासायनिक फवारणी करावी.

जेथे प्रादुर्भाव 5 ते 10 टक्क्यां दरम्यान आहे अशा ठिकाणी सायपरमेथ्रीन 10 टक्के ईसी 8 मि.ली किंवा  सायपरमेथ्रीन 25 ईसी 3.5 मि.ली. किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 ईसी 10 मि.ली.  किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 ईसी 12 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

जेथे प्रादुर्भाव 10 टक्केच्यावर आहे अशा ठिकाणी आवश्यकते अनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून खालील पैकी कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ट्रायझोफॉस 35 टक्के+डेल्टामेथ्रीन 1 टक्के 17 मि.ली.  किंवा क्लोरोपायरीफॉस 50 टक्के+सायपरमेथ्रिन 5 टक्के 20 मि.ली. किंवा इंडोक्झकार्ब 14.5 टक्के+ॲसीटामिप्रीड 7.7 टक्के 10 दिवसांनी दुसरी फवारणी करावी, असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील किटकशास्त्र विभागाचे प्रमुख व कृषि सहसंचालक अमरावती विभाग यांनी कळविले आहे.

00000

शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारींची राज्यपालांना ग्रामीण भागांना भेट देण्याची विनंती

 


शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारींची

राज्यपालांना ग्रामीण भागांना भेट देण्याची विनंती 

        अमरावती, दि. 6 : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुंबई येथील राजभवन येथे भेट घेतली. या भेटीत श्री. तिवारी यांनी राज्यपाल यांनी यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागाला भेट देण्याची विनंती केली.

          राज्यपाल यांनी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर, पांढरकवडा, झरी जामनी आणि मारेगाव ग्रामीण भागात भेटीच्या कार्यक्रमासाठी वेळ द्यावा अशी विनंती श्री. तिवारी यांनी केली. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आणि आदिवासींचे प्रश्न आणि निर्माण झालेल्या अनुशेषाचा मुद्दा श्री. तिवारी यांनी का सादरीकरण राज्यपाल यांना साद‍र केले.

आदिवासी आणि ग्रामीण भागाची स्थिती आणि जीवनशैली पाहून राज्यपाल यांना असलेल्या विशेष अधिकारांतर्गत उपाययोजना आखण्यात यावी, यासाठी श्री. तिवारींनी राज्यपाल यांची भेट घेतली. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील मागासलेल्या भागातील समसमान संधी आणि खर्चासाठी समान रकमेचे वाटप निश्चित करण्यासाठी राज्यपालांना विशेष अधिकार प्राप्त आहेत. त्याचा वापर करणे क्रमप्राप्त असल्याचे तिवारी यांनी विशद केले. संपूर्ण राज्याच्या आवश्यकतांच्या अधीन असलेल्या तंत्रज्ञान शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण आणि राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या सेवांमध्ये रोजगारासाठी पुरेशा संधी उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्याचा घटनाप्रदत्त अधिकार राज्यपाल यांना असून या भागात राज्यपालांची भेट आदिवासी, शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या नैतिकतेला चालना देईल. तसेच होणाऱ्या दुर्दैवी घटना कमी होतील. त्यामुळे राज्यपाल यांनी या भागांना भेट देण्यासाठी वेळ द्यावा, यासाठी श्री. तिवारी यांनी राज्यपाल यांची भेट घेतली.

0000

 

 

 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या 8 नामनिर्देशन पत्राची उचल

 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी

दुसऱ्या 8 नामनिर्देशन पत्राची उचल

अमरावती, दि. 6 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी 8 नामनिर्देशन पत्राची उचल करण्यात आली.

            आज अर्जाची उचल केलेल्यांमध्ये तनवीर आलम सैयद मियाज अली, निशांत रविंद्र हरणे, प्रा. अरविंद माणिकराव तट्टे, प्रकाश बाबाराव काळबांडे, डॉ. मुस्ताक रहेमान शहा, सुनिल मोतीराम पवार, अविनाश मधुकर बोर्डे, विजय रामराव लुंगे यांचा समावेश आहे.

00000

 

 

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य कार्यालय नवसारी येथे स्थलांतरित

 

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य कार्यालय

नवसारी येथे स्थलांतरित

        अमरावती, दि. 5 : अमरावती येथील उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, अमरावती कार्यालय विमको कॉम्प्लेक्स, गाडगेनगर, अमरावती येथून दि. 1 नोव्हेंबर 2020 पासून स्थलांतरित झाले असून या कार्यालयाचा नविन पत्ता उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, प्लॉट नं. 13 अ, निशीगंधा कॉलनी, जवाहर नगर, नवसारी, अमरावती  असा आहे, असे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य अमरावतीचे उपसंचालक यांनी कळविले आहे.

00000

 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज 19 नामनिर्देशन पत्राची उचल

 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी

आज 19 नामनिर्देशन पत्राची उचल

अमरावती, दि. 5 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी 19 नामनिर्देशन पत्राची उचल करण्यात आली.

            आज अर्जाची उचल केलेल्यांमध्ये अनिल मधुकरराव काळे, प्रविण ऊर्फ पांडुरंग नानाजी विधळे, संगिता सचिंद्र शिंदे (बोंडे), राजकुमार श्रीराम बोनकीले, राजेंद्र तुळशिराम गुजरे, रमेश दत्तुजी चांदुरकर, नरेंद्र कौर, शेखर ऊर्फ चंद्रशेखर मनोहर भोयर, संजय वासुदेवराव आसोले, सुनिल नारायणराव जयसिंगपुरे, दिलीप आनंदराव निभोंरकर, अभिजीत मुरलीधर देशमुख, गणेश के. सानप, शरदचंद्र कृष्णराव हिंगे, विकास भास्करराव सावरकर, ॲड. राम बुरंगे, डॉ. संजय साळीवकर, डॉ. निलेश देशमुख, रविंद्र लाखोडे यांचा समावेश आहे.

00000

विलासनगर गोडाऊनची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

 










विलासनगर गोडाऊनची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

अमरावती, दि. 5 : शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी मतमोजणी केंद्र विलासनगर गोडाऊन येथे राहणार असून, मोजणी केंद्राच्या अनुषंगाने तिथे आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ, सुरक्षितता उपाययोजना आदींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज येथे दिले.

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने या जागेची पाहणी श्री. सिंह यांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अनेक निवडणूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.    

मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी केंद्रावर आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ, सुरक्षिततेच्या दृष्टीने करावयाच्या सर्व उपाययोजना, आवश्यक सूचनाफलक आदी सर्व तजवीज ठेवावी. आयोगाच्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंह यांनी दिले. गोडाऊनच्या सर्व परिसराची श्री. सिंह यांनी पाहणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश दिले.

मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे. या मतमोजणी केंद्रावर दोन हॉलमध्ये मोजणीची सुविधा असेल. एकूण 14 टेबल असतील. जिल्ह्यात 25 मतदान केंद्रे असून, एक डिसेंबरला मतदान होईल.

000000