शेतकऱ्यांनी
कपाशीवरील गुलाबी
बोंडअळीचे
व्यवस्थापन करावे
अमरावती,
दि. 6 : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 10
टक्क्यापर्यंत होता परंतू त्यात वाढ होऊन ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तो 15 ते
20 टक्के झाला. नोव्हेंबर महिन्यात वातावरण गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक
झाले आहे. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. नाकारता येत
नाही. पिकाचे किडीपासून संरक्षणाकरीता विभागातील शेतकरी बांधवांनी उपाययोजना करण्यासाठी,
असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथील किटकशास्त्रज्ञाच्या शेतकऱ्यांना
उपाययोजना सांगीतल्या.
प्रत्येक
आठवड्यात 20 झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील मध्यम आकाराचे मध्यम पक्व झालेले
बाहेरुन किडके नसलेले एक बोंड असे 20 बोंडे तोडून ते भुईमुंगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने
टिचवुन त्यामधील किडक बोंड व अळ्याची संख्या मोजून, ती दोन किडक बोंड किंवा पांढुरक्या
रंगाच्या लहान अळ्या आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी (5 ते 10 टक्के) समजून खालील सांगीतल्याप्रमाणे
रासायनिक फवारणी करावी.
जेथे प्रादुर्भाव 5 ते 10 टक्क्यां
दरम्यान आहे अशा ठिकाणी सायपरमेथ्रीन 10 टक्के ईसी 8 मि.ली किंवा सायपरमेथ्रीन 25 ईसी 3.5 मि.ली. किंवा इंडोक्झाकार्ब
15.8 ईसी 10 मि.ली. किंवा डेल्टामेथ्रीन
2.8 ईसी 12 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास
15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
जेथे प्रादुर्भाव 10 टक्केच्यावर
आहे अशा ठिकाणी आवश्यकते अनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून खालील पैकी कोणत्याही
एका मिश्र किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ट्रायझोफॉस 35 टक्के+डेल्टामेथ्रीन
1 टक्के 17 मि.ली. किंवा क्लोरोपायरीफॉस
50 टक्के+सायपरमेथ्रिन 5 टक्के 20 मि.ली. किंवा इंडोक्झकार्ब 14.5 टक्के+ॲसीटामिप्रीड
7.7 टक्के 10 दिवसांनी दुसरी फवारणी करावी, असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील
किटकशास्त्र विभागाचे प्रमुख व कृषि सहसंचालक अमरावती विभाग यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा