शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी
आज 6 नामनिर्देशन पत्राची उचल
अमरावती, दि. 9 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती
विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या चौथ्या
दिवशी 6 नामनिर्देशन पत्राची उचल करण्यात आली.
आज अर्जाची उचल केलेल्यांमध्ये किरण रामराव
नाईक, सतिश माधव काळे, डॉ. नितीन धांडे, रामदास गंगाराम इंगळे, भाऊराव सरकटे, डॉ. नितीन
गणपत चवाळे यांचा समावेश आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा