शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारींची राज्यपालांना ग्रामीण भागांना भेट देण्याची विनंती

 


शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारींची

राज्यपालांना ग्रामीण भागांना भेट देण्याची विनंती 

        अमरावती, दि. 6 : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुंबई येथील राजभवन येथे भेट घेतली. या भेटीत श्री. तिवारी यांनी राज्यपाल यांनी यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागाला भेट देण्याची विनंती केली.

          राज्यपाल यांनी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर, पांढरकवडा, झरी जामनी आणि मारेगाव ग्रामीण भागात भेटीच्या कार्यक्रमासाठी वेळ द्यावा अशी विनंती श्री. तिवारी यांनी केली. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आणि आदिवासींचे प्रश्न आणि निर्माण झालेल्या अनुशेषाचा मुद्दा श्री. तिवारी यांनी का सादरीकरण राज्यपाल यांना साद‍र केले.

आदिवासी आणि ग्रामीण भागाची स्थिती आणि जीवनशैली पाहून राज्यपाल यांना असलेल्या विशेष अधिकारांतर्गत उपाययोजना आखण्यात यावी, यासाठी श्री. तिवारींनी राज्यपाल यांची भेट घेतली. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील मागासलेल्या भागातील समसमान संधी आणि खर्चासाठी समान रकमेचे वाटप निश्चित करण्यासाठी राज्यपालांना विशेष अधिकार प्राप्त आहेत. त्याचा वापर करणे क्रमप्राप्त असल्याचे तिवारी यांनी विशद केले. संपूर्ण राज्याच्या आवश्यकतांच्या अधीन असलेल्या तंत्रज्ञान शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण आणि राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या सेवांमध्ये रोजगारासाठी पुरेशा संधी उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्याचा घटनाप्रदत्त अधिकार राज्यपाल यांना असून या भागात राज्यपालांची भेट आदिवासी, शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या नैतिकतेला चालना देईल. तसेच होणाऱ्या दुर्दैवी घटना कमी होतील. त्यामुळे राज्यपाल यांनी या भागांना भेट देण्यासाठी वेळ द्यावा, यासाठी श्री. तिवारी यांनी राज्यपाल यांची भेट घेतली.

0000

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा