दहावी, बारावीच्या खासगीरित्या परिक्षा देणाऱ्या
विद्यार्थ्यानी
28 नोव्हेंबरपर्यत अर्ज सादर करावे
अमरावती,
दि. 4 : शैक्षणिक सत्र 2021 मध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या खासगीरित्या प्रविष्ठ
होणाऱ्या विद्यार्थ्यानी नाव नोंदणी अर्ज (फॉर्म न. 10) 28 नोव्हेंबर पर्यत ऑनलाईन
प्रक्रियेव्दारे सादर करावे अशी माहिती अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सहायक सचिव
यांनी दिली. विद्यार्थ्यानी मुळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या
दोन छायाप्रती व मुळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संर्पक केंद्र शाळेत/ कनिष्ठ
महाविद्यालयामध्ये जमा करावे. विद्यार्थ्यानी शाळा सोडल्याचा दिनांक व दाखला दिल्याचा
दिनांक याबाबत पात्रतेसाठी शाळा सोडल्याचा दिनांक ग्राहय धरण्यात येईल. विद्याथ्याने
अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत, नसल्यास व्दितीयप्रत व प्रतिज्ञापत्र,
आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत: जवळ ठेवावा. पात्र विद्यार्थ्यांना
नोंदणी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परिक्षेची आवेदपत्रे मंडळाने
विहित केलेल्या कालावधीत परिक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. यांची नोंद विद्यार्थ्यानी
घ्यावी असे विभागीय राज्य मंडळाने कळविले
आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा