बुधवार, १४ मे, २०२५

छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

अमरावती, दि. 13 : स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अपर आयुक्त रामदास सिध्दभट्टी, उपायुक्त अजय लहाने, राजीव फडके, संतोष कवडे, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे, नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण अभिवादन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा